मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आई कुठे काय करते' फेम संजना आहे परफ्यूम Lover; तुम्हीही पाहा अभिनेत्रीच्या बॅगेत असतात कोणत्या गोष्टी

'आई कुठे काय करते' फेम संजना आहे परफ्यूम Lover; तुम्हीही पाहा अभिनेत्रीच्या बॅगेत असतात कोणत्या गोष्टी

प्रत्येक अभिनेत्रींकडे एक बॅग असतेच. त्यामुळे चाह्त्यांना नेहमीच हे जाणून हेण्याची उत्सुकता असते. की या बागेत नेमकं काय असतं. त्यामुळेच आज आपण तुमची आवडती मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate)  मालिकेतील संजना (Sanjna) अर्थातच रुपाली भोसलेच्या  (Rupali Bhosales Bag)  बागेची एक खास झलक दाखवणार आहोत.

प्रत्येक अभिनेत्रींकडे एक बॅग असतेच. त्यामुळे चाह्त्यांना नेहमीच हे जाणून हेण्याची उत्सुकता असते. की या बागेत नेमकं काय असतं. त्यामुळेच आज आपण तुमची आवडती मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) मालिकेतील संजना (Sanjna) अर्थातच रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosales Bag) बागेची एक खास झलक दाखवणार आहोत.

प्रत्येक अभिनेत्रींकडे एक बॅग असतेच. त्यामुळे चाह्त्यांना नेहमीच हे जाणून हेण्याची उत्सुकता असते. की या बागेत नेमकं काय असतं. त्यामुळेच आज आपण तुमची आवडती मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) मालिकेतील संजना (Sanjna) अर्थातच रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosales Bag) बागेची एक खास झलक दाखवणार आहोत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 5 डिसेंबर-  कलाकार   (Stars)   आणि चाहते   (Fans)   यांच्यामध्ये एक खास नातं असतं. चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळे चाहते यांच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात. कलाकारांची प्रोफेशनल लाईफ असो किंवा पर्सनल चाहत्यांना त्यामध्ये फारच इंटरेस्ट असतो. चाहते त्यातल्या त्यात मुली आपल्या आवडत्या अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सपासून ते त्यांच्या फिटनेस पर्यंत सर्वच गोष्टी फॉलो करत असतात. तसेच प्रत्येक अभिनेत्रींकडे एक बॅग असतेच. त्यामुळे चाह्त्यांना नेहमीच हे जाणून हेण्याची उत्सुकता असते. की या बागेत नेमकं काय असतं. त्यामुळेच आज आपण तुमची आवडती मालिका 'आई कुठे काय करते'  (Aai Kuthe Kay Karate)   मालिकेतील संजना  (Sanjna)  अर्थातच रुपाली भोसलेच्या   (Rupali Bhosales Bag)   बॅगेची एक खास झलक दाखवणार आहोत. स्टार प्रवाहवर आपल्या भेटीला येणारी मालिका 'आई कुठे काय करते' फारच लोकप्रिय झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तसेच या मालिकेतील कलाकरांना एक नवी ओळख मिळाली आहे. रसिक प्रेक्षकांनी मालिकेतील प्रत्येक कलाकाराला भरभरून प्रेम दिल आहे. मग ते मुख्य अभिनेत्री असो किंवा खलनायिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले. अभिनेत्री रुपाली भोसलेचा एक विशेष चाहता वर्ग आहे. आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांना सतत तिच्या अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं. मालिकेत संजना जितकी स्टायलिश आणि बिनधास्त आहे. खऱ्या आयुष्यातील रुपालीसुद्धा तितकीच स्टायलिश आहे. काही महिन्यांपूर्वी राजश्री मराठीने एक बॅग सेगमेंट केलं होतं, त्यामध्ये रुपालीनेसुद्धा आपल्या बॅगेची ओळख करून दिली होती. त्यामुळे तुम्हाला रुपालीची बॅग पाहताना फारच मज्जा येणार आहे. काय काय आहे अभिनेत्रीच्या बॅगेत- रुपाली भोसलेने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे, की तिला नेहमीच नीटनेटकेपणा आवडतो. तिला प्रत्येक गोष्ट ज्या त्या जागेवर नीट ठेवायला आवडते. त्यामुळेच तिची बॅगसुद्धा तितकीच सुंदर आणि नीटनेटकी आहे.या व्हिडीओमध्ये रुपाली सांगते या बॅगेत माझा संसार असतो. व्हिडीओच्या सुरुवातीला रुपाली सांगते कि तिच्या बॅगेला तिने एक छोटंस पाऊच लावलं आहे. त्यात ती अत्यावश्यक वस्तू ठेवते. यामध्ये ती कारची किल्ली, रबर बँड, कल्चर, आणि आयफोनच हॅन्डसफ्री ठेवते. त्यांनतर ती बॅगेत एक गोष्ट घ्यायला कधीही विसरत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे तिचा फोन. या फोनला तिने एक इंटरेस्टिंग कव्हर लावला आहे. त्यावर डू नॉट टच माय फोन असं लिहिलं आहे. त्यांनतर तिच्याकडे पॉवर बँक आवर्जून असते. कारण शूटिंगच्या निमित्ताने तासांतास त्यांना बाहेर राहावं लागत अशावेळी फोन चार्ज करण्यासाठी याची आवशक्यता असते. त्यांनतर ती कोणताही सीजन असो सनस्क्रीम आवर्जून ठेवते. तसेच तिला ग्लास अर्थतच गॉगलची फार आवड आहे. त्यामुळे काही वावगेळे ग्लास ऑप्शन तिच्या बॅगेत असतात. सोबतच ती ग्लास स्वच्छ करण्याच्या टिप्सही चाहत्यांना देते. त्यांनतर ती आपली छोटीशी कार्ड आणि पैशांची पर्स दाखवते. त्यात ती आपले पासपोर्ट साईज फोटोसुद्धा कॅरी करते. ती जरी जुनी झाली असली तरी माझ्यासाठी खूप लकी असल्याची ती सांगते. तसेच ती चार्जिंगसाठी केबलसुद्धा ठेवते. त्यानंतर ती एक छोटासा डब्बा दाखवते त्यामध्ये लवंग आणि वेलदोडे असतात. यावर ती सांगते मला च्युईंगम चघळायला नाही आवडत. त्यामुळे मी माउथ फ्रेशननिंगसाठी या गोष्टी माझ्या बॅगेत ठेवते. (हे वाचा: Video : नव्या मालिकेत भार्गवी चिरमुले दिसणार आईच्या भूमिकेत) एक अभिनेत्री म्हणून त्यांना आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच त्यांना काही कॉस्मेटिक्स वगैरेही जवळ ठेवावे लागतात. तिच्याकडे एक हॅन्ड क्रीमसुद्धा असते. तसेच लिपबाम, विविध लिपस्टिकच्या शेड्स, मस्कारा, लायनर असं मेकअपच साहित्यही तिच्या सोबत बॅगेत असतं. तसेच चेहऱ्यावर फ्रेशनेस आणण्यासाठी ती मोगऱ्याचं फेसमिस्ट देखील वापरते. आणि महत्वाचं म्हणजे रुपाली सांगते कि मी खूप जास्त परफ्युम लव्हर आहे. त्यामुळे त्याच्या अनेक बॉटल्स माझ्या बॅगेत असतात. त्यानंतर अभिनेत्रीकडे पिंक कलरची आणखी एक बॅग आहे . त्यात तिला लहान लहान पाऊच ठेवायला आवडत जेणेकरून हवी ती गोष्ट पटकन सापडेल. यामध्ये खासकरून तिचं मेकअप साहित्य असतं. सोबत यामध्ये ती नेल कटरसारख्या गोष्टीही कॅरी करते. अशा पद्धतीने तुमची लाडकी संजना आपल्यासोबत दररोज बॅगेत या गोष्टी कॅरी करत असते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या