Home /News /entertainment /

'विजू मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे आता देवांना...' मिलिंद गवळींनी शेअर केला आठवणींचा खजिना

'विजू मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे आता देवांना...' मिलिंद गवळींनी शेअर केला आठवणींचा खजिना

नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर करत काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबत एक व्हि़डिओ देखील शेअर केला आहे.

  मुंबई, 21 मे- अभिनेते मिलिंद गवळी गवळी ( Milind Gawali )सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. सध्या ते आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte ) मालिकेत अनिरुद्धची नकारात्मक भूमिका साकारताना दिसतात. भूमिका जरी नकारात्मक असली तरी यामुळे मिलिंद यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. मिलिंद गवळी यांनी हास्य रस..नवरसांपैकी हा एक सुंदरसा रस..असं म्हणत विजू मामा चव्हाण ,लक्ष्मीकांत बेर्डे अशोक मामा सराफ , चेतन राव दळवी , आतुल परचूरे, मंगेश देसाई, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, विजय पाटकर ,योगिनी पोफळे , सुधीर जोशी, जनार्दन लवंगारे ,भारत गणेशपुरे ,मकरंद अनासपुरे ,भरत जाधव यांच्यासोबतच्या फोटोंचा एक कोलाज केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय या व्हिडिओला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''हास्य रस नवरसांपैकी हा एक सुंदरसा रस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाकीचे आठ रस किती महत्त्वाचे आहेत मला माहिती नाही , पण हा रस खूपच महत्त्वाचा आहे.'' वाचा-संजनाला स्वयंपाक येत नाही पण रूपालीला येतो, विश्वास नसेल तर हा VIDEO पाहा ''हास्यरस जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर मला असं वाटतं या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. जगण्यासाठी नवरसांपैकी हास्य रस खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे.ज्याच्या कोणाच्या आयुष्यामध्ये हा रस कमी असेल तर एक वॉर्निंग warning समजावी आणि लगेच हास्य रस आपल्या आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आणायचा प्रयत्न करावा.'' वाचा-शाहीर साबळ्यांच्या लुकसाठी अंकुशने केली जोरदार मेहनत, BTS VIDEO होतोय VIRAL! ''मी बरेच वेळा सांगितले की मी खूप नशीबवान आहे त्याचं कारण माझ्या आयुष्यामध्ये हास्यरस तर आहेच पण असे अनेक लोक माझ्या आयुष्यात आहेत जे हास्यरस निर्माण करतात, हजारो-लाखो लोकांना ते खळखळून हसायला भाग पडतात , सध्या ते काम माझा सांगलीचा जीवश्चकंठश्च मित्र वसंतराव हंकारे @_vasanthankare करत आहे ,तो वीर रसापासून हास्यरसा पर्यंत सगळेच रस तो आपल्या युवकांपर्यंत पोचवत आहे.'' वाचा-लग्नाला न आल्याने ह्रताच्या सासूने भरला अंजिक्यला दम, म्हणाल्या आता... ''माझ्या आयुष्यात हास्यरस निर्माण करणारे अनेक आले , त्यात विजू मामा चव्हाण ,लक्ष्मीकांत बेर्डे अशोक मामा सराफ , चेतन राव दळवी , आतुल परचूरे, मंगेश देसाई, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, विजय पाटकर ,योगिनी पोफळे , सुधीर जोशी, जनार्दन लवंगारे ,भारत गणेशपुरे ,मकरंद अनासपुरे ,भरत जाधव , किती किती नाव घेऊ मी,आणि सगळ्यात सुपर टॅलेंटेड super Talented म्हणजे सतीश तारे कम्प्लीट वेडा माणूस होता, तो कॉमेडीचा बादशाहच, मी किती भाग्यवान आहे मला या सगळ्या हास्यसम्राटांन बरोबर काम करायला मिळालं , तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की मी माझ्या या सिनेमाच्या प्रवासामध्ये किती हसलो असेन यांच्या सानिध्यात.''
  ''विजू मामा ना तर मी क्षणाक्षणाला मिस miss करतो विजू मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे एकत्र आले कि जो काय आहे हायदोस घालायचे, ते कोणालाच सोडायचे नाहीत. मग मला कसं सोडलं असेल. Miss you’ll Very Much.जे आता आपल्या नाहीत, ते नक्कीच देवांना हसवत असतील. हास्य सम्राटचं होते ते सगळे.''
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या