Home /News /entertainment /

'मी मागे फिरायचं ठरवत होते..' 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीची नवी पोस्ट चर्चेत

'मी मागे फिरायचं ठरवत होते..' 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीची नवी पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) ही मराठी मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेमुळे यातील कलाकारांनासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिका साकारत आहे. ती या भूमिकेत अरुंधतीच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

पुढे वाचा ...
    मुंबई,10 मे- 'आई कुठे काय करते'   (Aai Kuthe Kay Karate)  ही मराठी मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेमुळे यातील कलाकारांनासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिका साकारत आहे. ती या भूमिकेत अरुंधतीच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मधुराणी सतत सोशल मीडियावर विविध विषयांवर पोस्ट लिहीत असते. ती सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यासंबंधी पोस्ट शेअर करत असते. मधुराणी आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. ती आपल्या लेकीच्या फारच जवळ आहे. परंतु शूटिंगमुळे ती मुंबईत असते. आणि तिची मुलगी आणि संपूर्ण कुटुंब पुण्यात राहतो. त्यामुळे तिला सारखं भेटणं होत नाही. परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती आपल्या मुलीसोबत धम्माल करताना दिसून येते. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती आपल्या मुलीसोबत अडव्हेंचर पार्कमध्ये दिसून येत आहे. सोबतचे अभिनेत्रीने एक भलीमोठी पोस्टसुद्धा लिहिली आहे. मधुराणी प्रभुलकर- साहस ....धाडस हे शब्द एका वयानंतर अनेकांच्या आयुष्यात केवळ काही निर्णयांपुरते सीमित राहतात... अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो... त्यातला थरार अनुभवणं सोडून देतो... स्वतः ला चौकटीत अडकवून घेतो खरेखुरे धाडसी खेळ खेळून मलाही काळ लोटला होता...केवळ मुलीला साथ द्यायची म्हणून मी करायचं ठरवलं... 'मुलांचंच आहे .... सोप्पं असेल आपण अस्स करू' ह्या भ्रमात मी होते .एकेक challenging पायऱ्या पार करत करत तो टॉवर वरपर्यंत आम्हाला चढायचा होता.एखाद्या पायरीवर दोरीला बांधलेले , हवेत तरंगणारे लाकडाचे ब्लॉक्स होते ... एका पायरीवर लटकणारे टायर्स होते ... कुठे लाकडी लटकणारे बोगदे होते ज्यातून रांगत जायचं होतं... एकंदरीत ह्यातलं मी कधीच काही केलं नव्हतं.
    अभिनेत्री पुढे लिहिते ''माझे पाहिल्याच पायरीवर त्राण गेले.... अशक्य वाटायला लागलं....मी मागे फिरायचं ठरवत होते ..मी घाबरले तशी स्वरालीपण मागे फिरायला लागली , मला हे असं व्हायला नको होतं ... मी तिच्यासाठी करत होते, मी घाबरले तर ती हे कधीच करणार नाही ....होतं न्हवतं ते सगळं धैर्य एकवटून मी ती पहिली स्टेप पार केली तशी मला बघून स्वरालीनी पण पार केली ....पुढचं करायचा धीर आला.... तरी प्रत्येक वळणावर' हे आपल्याला नाहीच जमणार ' असं वाटतच होतं... तरी आमचा trainer मनोहर खूपच बळ देत होता... एकेक करत पुढे पुढे जात राहिलो आता मागे वळण्याचा स्कोप नव्हता समोर येईल ते पार करणं भागच होतं...आम्ही दोघी जेव्हा वर पोहचलो तेव्हा मला अक्षरशः रडायला येत होतं....आपल्या आतलं , आपल्यालाच मागे खेचणारं काहीतरी आपण पार केलं अश्या जणीवेनी थरथरायला होत होतं...करून बघितल्याशिवाय कळतच नाही नं आपण काय करू शकतो
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या