स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. मालिकेत नुकतंच अरुंधतीने आपलं नवं हक्काचं घर खरेदी केलं आहे. याशिवायच आशुतोषने संपूर्ण कुटुंबासोबतच अरुंधतीसमोर आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अरुंधतीने या गोष्टीला नकार दिला असला तरीसुद्धा आप्पा आणि अविनाश त्यांची भेट जुळवून आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. (हे वाचा:हे माझं स्वप्न पण घरच्या जबाबदारीत मागे पडलं..कुशलची पत्नीसाठी भावुक पोस्ट ) नुकतंच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये, ' समृद्धी बंगल्यामध्ये जे काही घडलेलं असतं ते अनघा आणि अविनाश आप्पांना सांगतात. ते सांगत असताना तिथं कांचन येते. तिला पाहून आप्पा अनघा आणि अविनाशला म्हणतात की, 'यांच्या मनातली घाण स्वच्छ होणारच नाही. अनिरुद्ध आता अरुंधतीचा नवरा नाही. पण बदललेली परिस्थिती तुम्हाला समजून घ्यायचीच नाही. मी असतो तर त्याला सांगितलं असतं, मी माझ्या लेकीला समजावतो, तू तिच्याशी लग्न कर.. 'आप्पांचं हे बोलणं ऐकून कांचनला मोठा धक्का बसतो'. यावरून असं म्हटलं जात आहे की, आता आप्पाच अरुंधती आणि आशुतोषचं लग्न लाऊन देणार आणि या मालिकेचा शेवट होणार.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment, Tv actress