मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rupali Bhosale: अरुंधतीनंतर आता संजना हॉस्पिटलमध्ये दाखल; पोस्ट करत म्हणाली 'आयुष्यात कधीकधी...'

Rupali Bhosale: अरुंधतीनंतर आता संजना हॉस्पिटलमध्ये दाखल; पोस्ट करत म्हणाली 'आयुष्यात कधीकधी...'

रुपाली भोसले

रुपाली भोसले

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेचा चाहता वर्ग मोठा आहे. आता मात्र रुपालीच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 25 नोव्हेंबर : 'आई कुठे काय करते' ही मालिका आजच्या घडीला मराठीतील टॉपच्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अरुंधतीचं पात्र जेवढं लोकप्रिय आहे तितकच लोकप्रिय आहे यात नकारात्मक भूमिका साकारणार 'संजना'. संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारते. हिंदीतील काही मालिका, बिग बॉस मराठी त्यानंतर आता आई कुठे काय करते मधील ही अभिनेत्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. रुपालीचा चाहता वर्गही  मोठा आहे. आता मात्र रुपालीच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी एक बातमी आहे. रुपाली भोसलेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही  बातमी सांगितली आहे.

रुपाली भोसले म्हणजेच संजना काही काळ मालिकेतून गायब आहे. आता तिच्या गायब होण्याचं कारण समोर आलं आहे. रुपालीची निकटीचं एक छोटी शस्त्रक्रिया पार पडली आहे. इंस्टाग्रामवर तिने तिचे उपचारादरम्यानचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही  बातमी दिली आहे. त्यासोबतच तिने एक महत्वाचा सल्ला देखील चाहत्यांना दिला आहे.

हेही वाचा - Phulala sugandh maticha: 'एकदा शेवटचंच...'; कीर्ती आणि शुभमला कायमचा निरोप देताना कलाकार भावुक

रुपालीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय कि, ''दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी आधी स्वतःची काळजी घेणे आवश्यक  आहे. झाड जितके निरोगी तितके चांगले फळ देऊ शकते.'' पुढे तिने म्हटलंय कि, ''आपल्याला जीवनात कधीकधी कल्पनेपलीकडील गोष्टींना तोंड देण्याची वेळ येते. पण त्यातही आपण स्वतःला फक्त आनंदी ठेवत त्या गोष्टीला हसत सामोरे जाणं भाग आहे. #आयुष्य सुंदर आहे.टट

पुढे तिने तिच्या तब्येतीविषयी सांगत म्हटलंय कि, 'काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली पण आता मी बरी आहे आणि हळूहळू माझ्या तब्येतीत फरक दिसून येत आहे. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. बर्‍याच वेळा आपण आपल्या शरीरात जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. जोपर्यंत शरीरातील वेदना जीवघेणी ठरत नाही तोपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण मी सर्वांना गंभीरपणे विनंती करते की, आपल्या स्वास्थ्याकडे प्लिज दुर्लक्ष करू नका. काही होत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा. तुम्ही तुमचे शरीर आणि स्वतःला गृहीत धरू नका.'' असा मोलाचा सल्ला तिने यावेळी दिला आहे.

यासोबतच रुपालीने तिच्यावर उपचार करणाऱ्या  डॉक्टरांचे आणि नर्सेसचे देखील आभार मानले आहेत. रुपालीच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये सध्या काळजीच वातावरण निर्माण झालं आहे. तिने केलेल्या या पोस्टवर तिचे सहकलाकार आणि चाहते कमेंट्स करत तिला धीर देत आहेत तसेच काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment