अभिनेत्री अश्विनी महांगडे 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील 'राणूआक्का' या भूमिकेतून घराघरात पोहोचली आहे. तिलाअल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ती सतत सामाजिक उप्रक्रमांत सहभाग घेत असते. ती अनेक संस्थामार्फत समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देत असते. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून ती अनेक उपक्रमांची आखणी करत असते. २०१९ मध्ये तिने 'रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन' असा उपक्रम राबवला होता. तसेच कोरोना काळामध्ये अश्विनीने गरजू व्यक्तींना अन्नदानसारखे अनेक सुंदर उपक्रम हाती घेतले होते.त्यामुळे ती आज महाराष्ट्राची लाडकी कन्या बनली आहे. (हे वाचा:ऋतुजा बागवेचा 'तो' Photo पाहून चाहत्याने थेट घातली लग्नाची मागणी) अश्विनीने नुकताच माध्यमांशी संवाद साधत असं सांगितलं, "माझे वडील म्हणजे नानांचं असं म्हणणं होतं की तू वर्षभर कितीही बिझी राहा मात्र वर्षातले तीन दिवस मात्र राखून ठेव. ते तीन दिवस म्हणजे आमची पसरणी गावची 2 दिवसाची जत्रा आणि दसरा. या तीन दिवसांना विशेष महत्व आहे. नाना आमच्यात नाहीत त्यामुळे यंदा त्यांचा वसा मी पुढे न्यायचं ठरवलं आहे. दसऱ्याला आमच्या गावी भैरवनाथाची पालखी निघते. त्या पालखी सोबत मी जाणार आहे. डोंगरदऱ्यातून वाट काढत ही पालखी निघते. हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो". असं म्हणत तिने आपल्या बाबांचं स्वप्न आयुष्यभर सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात कोरोनामुळेच अश्विनीच्या वडिलांचं निधन झालं होतं. ती सतत सोशल मीडियावर आपल्या वडिलांचे विचारत त्यांच्या आठवणी शेअर करत असते. (हे वाचा:नेहा पेंडसेने नवऱ्याला सर्वांसमोर केले किस अन् VIDEO झाला व्हायरल) अश्विनी महांगडे ही वाईजवळील, पसरणी या छोट्याशा गावातील कन्या आहे.गावात दरवर्षी असणाऱ्या यात्रे दरम्यान रंगणाऱ्या नाटकांमध्ये तिने अभिनय करत या प्रवासाची सुरुवात केली होती. पुढे तिने मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली. 'बॉईज' या चित्रपटातून तिने विशेष कौतुक मिळवलं होतं. त्यांनतर झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून तिने सर्वांच मन जिंकलं आहे. तिने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली होती.अशी ही महाराष्ट्राची लाडकी कन्या आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतचं खऱ्या आयुष्यातसुद्धा एक 'सुपर गर्ल'आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.