Home /News /entertainment /

'आई कुठे काय करते' फेम अरुंधीतनं शेअर केला बालपणीचा फोटो; स्टाईल पाहून थक्क व्हाल!

'आई कुठे काय करते' फेम अरुंधीतनं शेअर केला बालपणीचा फोटो; स्टाईल पाहून थक्क व्हाल!

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karate) मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) साकारली आहे. नुकताच तिनं तिच्या बालपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

  मुंबई, 23 जानेवारी- छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका लोकप्रियेत नंबर वनवर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे. या मालिकेचे कथानक अरुंधतीभोवती(Arundhati) फिरताना दिसते. अरुंधतीची भूमिका मालिकेत मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) साकारली आहे. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी मालिके संदर्भात असतील किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यामातून अपडेट देत असते. कधी फोटो तर कधी व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिनं तिच्या बालपणीचा एक गोड फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटच वर्षाव होत आहे. मधुराणी प्रभुलकरने तिचा आताचा आणि बालपणीचा फोटोचा मिळून कोलाज शेअर केला आहे. तिनं हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, Style में रेहेनेका....😎 तिचा या फोटोतील लुक अरुंधतीचा आहे. जशी तीनं आत पोज दिली आहे अगदी तशीच बालपणी दिली आहे. कॅप्शनला शोभतील अशाच पोज आहेत. चाहत्यांकडून देखील या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
  आई कुठे काय करते मालिकेत अभि आणि अनघाचे लग्न झाले आहे. यानंतर तिनं एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होते, नवीन सूनबाई आल्या...आता निघायची वेळ झाली. त्यामुळे अनघाच्या येण्यामुळं अरुंधती कुठेतरी चिंतामुक्त झाली आहे. देशमुख कुटुंबाला तिच्यासारखं हक्काचे माणूस मिळाल आहे. आता या पोस्टनंतर अरुंधती मालिकेत दिसत नाही. मात्र अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी यांनी तब्येतीच्या कारणासाठी मालिकेतून ब्रेक घेतल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर त्या सक्रिय असतात. अरुंधतीसोबतच्या अनेक आठवणी शेअर करत असतात. काही दिवसापूर्वी तिन अरुंधतीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ देखील चांगलाच चर्चेत आला होता. वाचा-शुभमंगल सावधान! अखेर रोहित -जुईलीच्या डोई पडल्या अक्षता काही भूमिका या कलाकाराला लोकप्रियता देतात त्याप्रमाणे जगायला देखील शिकवतात. अरुंधतीच्या भूमिकेने मधुराणीला लोकप्रियता दिली. यासोबतच अरुंधती ही ओळख दिली. आज अरुंधती तिनं घेतलेल्या निर्णयामुळे कितीतरी महिलांसमोर आदर्श बनली आहे. कधीकधी बंधनात जगण्यापेक्षा मनाचं ऐकून कठोर निर्णय घ्यावे लागतात. प्रसंगी यासाठी विरोध पत्कारावा लागतो. मात्र हे निर्णय आयुष्याला दिशा देणारे असतात. अरुंधतीच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या