मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai kuthe kay karate: अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यात होणार अनुष्काची एंट्री; मालिकेला येणार नवं वळण

Aai kuthe kay karate: अरुंधती आणि आशुतोषच्या आयुष्यात होणार अनुष्काची एंट्री; मालिकेला येणार नवं वळण

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे. मालिकेत आता अनुष्का या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 23 नोव्हेंबर : 'आई कुठे काय करते' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच 'आई कुठे काय करते' मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे. मालिकेत आता अनुष्का या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. त्याआधी तिने घरच्यांसमोर देखील तो निर्णय सांगितलं आहे. तो ऐकून अनिरुद्ध आणि कांचन तसेच अभिषेक आणि ईशाला चांगलाच धक्का बसतो. पण आता अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. आशुतोषची खूप जुनी मैत्रीण म्हणजेच अनुष्का मालिकेत येणार आहे.

हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अरुंधती घरच्यांसमोर देणार आशुतोषवरील प्रेमाची कबुली; काय असेल त्यांची प्रतिक्रिया?

आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

अनुष्का या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना स्वरांगी म्हणाली, ‘मी आई कुठे काय करते या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे आई काय काय करु शकते याचा अनुभव घेतच आहे. अश्यातच या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला. घरच्यांची खंबीर साथ असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. गेले कित्येक दिवस स्वरांगी तू सध्या काय करतेस हा प्रश्न मला नेहमी विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये मी अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारतेय.''

''शूटिंगच्या पहिल्याच दिवशी यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने सेटवर सर्वांची ओळख करुन दिली. देशमुख कुटुंबाने मला सामावून घेतलं आहे. सेटवर खुपच सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच काम करताना खूप मजा येतेय. आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांच्यामुळे अनुष्का हे पात्र खुलवण्यासाठी खूप मदत होतेय'' अशी भावना स्वरांगी मराठेने व्यक्त केली.

अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment