Home /News /entertainment /

Maha Minister: देव तारी त्याला कोण मारी! एका गायीने कसे वाचवले आदेश भाऊजींचे प्राण?

Maha Minister: देव तारी त्याला कोण मारी! एका गायीने कसे वाचवले आदेश भाऊजींचे प्राण?

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा अचूक प्रत्यय आदेश बांदेकरांना (Aadesh Bandekar) आल्याचं समोर येत आहे.

  मुंबई 20 जून: असं म्हणतात देवाचा हात ज्याचा डोक्यावर असतो त्यावर कधीच कुठलं संकट ओढवत नाही. असाच काहीसा प्रसंग आदेश भाऊजींना आला आहे. आदेश भाऊजी आपल्याला गेली जवळपास अठरा वर्ष ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) कार्यक्रमातून रोज भेटत आले आहेत. आता ते ‘महा मिनिस्टर’ (Maha Minister)कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. या एवढ्या प्रचंड कालावधीत त्यांना नक्की कोणकोणते प्रसंग लक्षात आहेत ते पाहूया. आदेश भाऊजी (Aadesh Bhauji)सध्या अकरा लाखाच्या पैठिणीच्या मानकरी शोधायला महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. महाराष्ट्रातून कोणती वहिनी या 11 लाखाच्या पैठणीची मानकरी होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) गेली जवळपास 18 वर्ष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहेत. आपल्या खास निवेदनशैलीत ते समोरच्याला आपलंस करून घेतात आणि मग संवादाच्या गप्पा केव्हा होतात कळत नाही. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बांदेकरांना अख्खा महाराष्ट्रच नाही तर भारत आणि देश विदेश सुद्धा फिरायला मिळाला. या एवढ्या मोठ्या प्रवासाकडे मागे वळून बघताना त्यांना काही आठवणींचा उल्लेख न करता राहवत नाहीये. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरून त्यांनी एक गंभीर किस्सा शेअर केला आहे. “सिन्नरला एका एपिसोडचं शूटिंग करून आमच्या टीमसह आम्ही परत येत होतो. तेव्हा तुफान पाऊस सुरु झाला. सिन्नरजवळ एक सुंदर तटबंदी असलेलं दगडी मंदिर होतं. ते पाहून मी दर्शनाला खाली उतरलो. दर्शन घेऊन झाल्यावर परत येऊन गाडीत बसलो तर गाडीसमोर एक गाय येऊन आडवी थांबली. एरवी गाय रस्त्यात येते आणि हॉर्न दिला की पटदिशी पुढे जाते. मात्र ही गाय काही जागची हलेना. असं साधारण बरच वेळ झालं आणि ती दहा-एक मिनिटांनी बाजूला झाली.
  चला आता सिग्नल मिळाला असं गंमतीत मी म्हणलं आणि आम्ही पुढे गेलो. पुढे इतका तुफान पाऊस सुरु झाला की आम्हाला पुढचंसुद्धा दिसत नव्हतं. आमची गाडी हळूहळू चालली होती आणि समोर एक वृद्ध आजोबा हाताने इशारा करून थांबवताना दिसले. तिकडे जाऊन प्रकरण काय आहे हे विचारलं तेव्हा कळलं की पुढच्या नदीवरचा पूल पाण्याने ढासळला आणि पडला. त्यांनी आम्हाला पर्यायी मार्गाने जा असं सांगितलं. नशीब बलवत्तर होतं त्यामुळे एका गायीने आमचा जीव वाचवला.” असा किस्सा आदेश बांदेकरांनी शेअर केला आहे. हे ही वाचा- आई समोर अमृता फेल! चंद्रमुखीच्या सक्सेस पार्टीत माय लेकींचा जबरदस्त डान्स तूफान व्हायरल अनेकांनी त्यांना कमेंट्समध्ये असं लिहिलं आहे, “देव पाठीशी आहे तुमच्या. तुमची पुण्याई आणि देवाचा आशीर्वाद याने तुम्ही वाचलात. तुम्ही आजपर्यंत सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अनेक वहिन्याच नाही तर आणि महाराष्ट्राच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.” आदेश भाऊजींबद्दल प्रत्येकालाच लळा आणि प्रेम आहे. भाजी सुद्धा प्रत्येकाला आपलंस करून घेण्यात कायम यशस्वी झाले आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या