Video : आदेश भाऊजींसोबत विक्रांत सरंजामे,गुरू आणि राधिका झाले 'झिंगाट'

Video : आदेश भाऊजींसोबत विक्रांत सरंजामे,गुरू आणि राधिका झाले 'झिंगाट'

मागील चार, पाच दिवसांपासून सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक आणि इंस्टाग्रामवर #ZingZingZingaat हा हॅशटॅग वापरून मराठी सेलिब्रेटींनी ठराविक अक्षरापासून गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओज बघायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : मागील चार, पाच दिवसांपासून सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक आणि इंस्टाग्रामवर #ZingZingZingaat हा हॅशटॅग वापरून मराठी सेलिब्रेटींनी ठराविक अक्षरापासून गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओज बघायला मिळत आहे. याची सुरुवात झाली, ती मराठीच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरील आदेश बांदेकरांच्या व्हिडिओपासून.

आदेश बांदेकरांनी या व्हिडिओमध्ये एक गाणं गाऊन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावेला त्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरापासून सुरु होणारं गाणं गाण्याचे चॅलेंज दिलं, तिथूनच अभिजीत खांडकेकर, भाऊ कदम, श्रेया बुगडे, अभिज्ञा भावे, संकर्षण कऱ्हाडे, अक्षया देवधर, इशा केसकर, अनिता दाते, सायली संजीव, धनश्री कडगांवकर, शिवानी बावकर, सागर कारंडे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटींनी या ऑनलाईन अंताक्षरीचे व्हिडीओ आपापल्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर पोस्ट केले.

मात्र आदेश बांदेकरांनी दिलेल्या या चॅलेंजच्या मागचे रहस्य नेमके आहे तरी काय? या प्रश्नाचं उत्तर आहे, झी मराठीवरील नवीन कथाबाह्य कार्यक्रम 'झिंग झिंग झिंगाट..! 'ऑनलाईन अंताक्षरी चॅलेंज' हा या कार्यक्रमाच्या प्रमोशनचा हा फंडा होता. २८ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत आदेश बांदेकर, म्हणूनच या आगळ्या वेगळ्या चॅलेंजची सुरुवात त्यांच्यापासून झाली. सेलिब्रेटींच्या गाण्यांच्या व्हिडीओजना सोशल मीडियावरील तरुणाईने तुफान रिस्पॉन्स दिला.

झिंगाट शो आहे सांगीतिक. म्हणजे अंताक्षरी, ताकधिनाधिन टाईप असेल. आणि त्या शोचं सूत्रसंचालन करणार आदेश बांदेकर. आदेशच्या करियरची सुरुवात ताकधिनाधिननंच झाली होती. होम मिनिस्टरमुळे घराघरात पोचलेले बांदेकर आता सांगितिक शोमधून भेटायला येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी झी मराठी अवाॅर्ड सोहळा मोठ्या दणक्यात झाला. यात अनेकविध कार्यक्रम झाले. मालिकांमधल्या व्यक्तिरेखांचा गौरव झाला. पण या सोहळ्यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम ठरला तो आदेश बांदेकर आणि सगळ्या नायक-नायिकांचं नृत्य.

सत्ते पे सत्ता सिनेमातल्या गाजलेल्या गाण्यांवर सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, अतुल परचुरे यांनी एकच धमाल केली. त्यांना साथ द्यायला ईशा, राधिका, पाठकबाई होत्याच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बनून आलेले आदेश भाऊजी. या सगळ्यांनी मिळून कार्यक्रमाला चार चांद लावले.

दीपवीर, प्रियांका-निकनंतर अजून एका सेलिब्रिटीचं शुभमंगल!

First published: November 27, 2018, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading