मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सनी लिओनीने या अभिनेत्याला केली विचित्र पद्धतीने मारहाण, VIDEO वेगाने होतोय व्हायरल

सनी लिओनीने या अभिनेत्याला केली विचित्र पद्धतीने मारहाण, VIDEO वेगाने होतोय व्हायरल

सनी लिओनीनं अल्पकाळातच आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचा एक मजेदार व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सनी लिओनीनं अल्पकाळातच आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचा एक मजेदार व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सनी लिओनीनं अल्पकाळातच आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिचा एक मजेदार व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई, 9 जानेवारी : अभिनेत्री सनी लिओनी (sunny Leone) आजकाल आपली आगामी वेब सिरीज (Web series)  'अनामिका'वर खूप कष्ट घेते आहे. याच वेब सीरिजची शूटिंग सध्या सुरू आहे. या सीरिजला विक्रम भट्ट दिग्दर्शित करत आहेत.

ही सीरिज एक अ‍ॅक्शन सीरिज (action series) आहे. या शुटिंगदरम्यान सेटवरचा एक व्हिडिओ बराच व्हायरल (viral video) झाला. या व्हिडिओमध्ये सनी आपल्या सहकलाकाराला विचित्र पद्धतीनं मारहाण करताना दिसत आहे. यात दिसतं आहे की अभिनेत्रीनं आपल्या हातांना सापांसारखं बनवलं आहे. आणि त्यांचा उपयोग करून ती सहकलाकाराला मारत आहे.

अभिनेत्री सनी लिओनीनं या व्हिडिओमध्ये ब्राऊन कलरचा जंप सूट घातला आहे. व्हिडिओ शेअर करताना या अभिनेत्रीनं कॅप्शन लिहिलं आहे, की माझ्यासारख्या मुव्ह्ज कुणाकडेच नाहीत.' सनीच्या या व्हिडिओला आतापर्यंत 12 लाखांहून लोकांनी पाहिलं आहे. यावर लोक विविध कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

'अनामिका' ही एक दहा भागांची अ‍ॅक्शन सीरिज आहे. तिचं शूटिंग मुंबईत झालं आहे. ही वेब सीरिज लवकरच एम एक्स प्लेअरवर (MX player) रिलीज होणार आहे. याशिवाय सनी लिओनी लवकरच 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासह अर्जुन रामपाल, दिगंगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक हेसुद्धा आहेत. याशिवाय सनी लवकरच 'कोला कोला' नावाच्या हॉरर कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे. रंगीला आणि वीरमादेवी हेसुद्धा तिचे आगामी सिनेमे आहेत.

सनी लिओनीची लोकप्रियता बिग बॉससोबत (Big Boss) वेगानं वाढत गेली. रईस सिनेमातल्या सनीच्या 'लैला'या गाण्यालाही चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं.

First published:

Tags: Viral video.