मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

गणेशोत्सवानिमित्त मालिकेतील बालकलाकारांना मिळाली झक्कास भेट, समोर आला सुंदर VIDEO

गणेशोत्सवानिमित्त मालिकेतील बालकलाकारांना मिळाली झक्कास भेट, समोर आला सुंदर VIDEO

गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. अशातच मराठी मालिकांमध्येही गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.

गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. अशातच मराठी मालिकांमध्येही गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.

गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. अशातच मराठी मालिकांमध्येही गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 28 ऑगस्ट: गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी खास असणार आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. अनेकांची मुर्ती बनवून तयार तर काहींनी फोटो आणि व्हिडीओही शेअर करायला सुरुवात केली आहे. एकंदरीत सगळेच बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मराठी मालिकांमध्येही गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने गणेशोत्सव स्पेशल 'Star प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022' गजर अष्टविनायकाचा सोहळा आयोजीत केला आहे. सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यानिमित्तानं अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहे. अशातच स्टार प्रवाहवरील मालिकेमधील बालकलाकारांना बाप्पांची मुर्ती देतानाचा एक गोड व्हिडीओ समोर आला आहे. स्टार प्रवाहकडून बालकलाकारांना हे खास गिफ्ट मिळालं आहे. या व्हिडीओनं सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. जनसामान्यांपासून विविध क्षेत्रातील लोकांपर्यंत सगळेच उत्सुक असून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.

हेही वाचा -  Amruta Khanvilkar Chanramukhi: चंद्राचा नवीन प्रवास सुरू; चंद्रमुखी 2 प्रेक्षकांच्या भेटीला?

दरम्यान, मराठी मालिकांमध्येही बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. सगळेचजण बाप्पाला घरी आणण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे सगळीकडेच बाप्पामय वातावरण झाल्याचं दिसतंय.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Marathi entertainment, Social media, Tv serial