मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘तिचं गाणं ऐकून प्रेरणा मिळते’; ए.आर. रेहमान आहेत या मराठी गायिकेचे फॅन

‘तिचं गाणं ऐकून प्रेरणा मिळते’; ए.आर. रेहमान आहेत या मराठी गायिकेचे फॅन

ए.आर.रेहमान यांनी सांगितला आपला प्रेरणास्त्रोत; या मराठी गायिकेची गाणी ऐकून होतात निवांत

ए.आर.रेहमान यांनी सांगितला आपला प्रेरणास्त्रोत; या मराठी गायिकेची गाणी ऐकून होतात निवांत

ए.आर.रेहमान यांनी सांगितला आपला प्रेरणास्त्रोत; या मराठी गायिकेची गाणी ऐकून होतात निवांत

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 11 एप्रिल: ए.आर. रेहमान (A R Rahman) हे भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी छोटी सी आशा, रंगीला रे, छैया छैया, रंग दे बसंती, जय हो यांसारख्या अनेक सुपहिट गाण्यांची निर्मिती केली आहे. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या या संगीतकारानं आजवर अनेक नामांकित गायकांसोबत काम केलं आहे. शिवाय स्वत: देखील ते एक उत्तम गायक आहेत. परंतु त्यांना स्वत:ला कोणाता गायक आवडतो? असा प्रश्न रसिकांना नेहमी पडतो. चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी इंडियन आयडल (Indian Idol) या कार्यक्रमात दिलं.

ए. आर. रेहमान म्हणाले, “माझे आवडते गायक सतत बदलत असतात. पण लहान पणापासूनच मायकल जॅक्सन आणि नुसरत फतेह आली खान यांना मी फॉलो करत आलो आहे. सध्याच्या काळात मी अंजली गायकवाडला फॉलो करत आहे. तिनं गायलेली गाणी मला आवडतात. तिचा आवाज खूप छान आहे. खास करुन मला तिनं गायलेली शास्त्रीय गाणी खूप आवडतात. आपण सध्या टपोरी गाण्यांच्या विश्वात आहोत त्यावेळी एखाद्या तरुण कलाकारानं शास्त्रीय गाणं गायलं की मला खूप आनंद होतो. मला नवीन गाणी तयार करण्याची प्रेरणा मिळते.”

अवश्य पाहा - दया बेननं का सोडलं तारक मेहता का उल्टा चष्मा?; अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण

" isDesktop="true" id="539358" >

अंजली गायकवाड ही इंडियन आयडलमधील एक स्पर्धक आहे. प्रामुख्यानं शास्त्रीय गाण्यांमुळं ती प्रसिद्ध झाली. आजवर या शोमध्ये आलेल्या अनेक सेलिब्रिटींनी तिच्या गायनकौशल्याचं कौतुक केलं आहे. अंजली रेहमान यांना आपला गुरु मानते. अन् आज त्यांनी देखील तिच्या गायनशैलीची तोंडभुरुन स्तुती केली. ए.आर. रहमान आपल्या ’99’ चित्रपटाच्या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी ‘इंडियन आयडल’ च्या सेटवर आले होते.

First published:

Tags: Entertainment, Song