सुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज

सुरांचा जादूगार रेहमान मराठी सिनेमाला संगीत द्यायला सज्ज

बाॅलिवूडचं सगळं लक्ष हल्ली मराठी सिनेमांकडे असतं, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. नुकतीच सुरांचा बादशहा ए.आर. रेहमाननं मराठी सिनेमाच्या म्युझिक लाँचला हजेरी लावली.

  • Share this:

मुंबई, 14 आॅक्टोबर : मराठी फिल्म इंडस्ट्री हल्ली जास्तीत जास्त ग्लॅमरस व्हायला लागलीय. बाॅलिवूडचं सगळं लक्ष हल्ली मराठी सिनेमांकडे असतं, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. नुकतीच सुरांचा बादशहा ए.आर. रेहमाननं मराठी सिनेमाच्या म्युझिक लाँचला हजेरी लावली.

तृप्ती भोईर फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'माझा अगडबम' या सिनेमाचं म्युझिक लाँच सोहळा संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या हस्ते मुंबईत पार पडला. या सोहळ्याच्या निमित्तानं रेहमान यांनी पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. या सिनेमाची गाणी रेहमान यांचे दीर्घकाळ सहकारी असलेल्या टी सतीश चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलीत. आपल्या शिष्याच्या या सिनेमाच्या म्युझिक लाँचिंगसाठी हजेरी लावून त्यांनी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना रेहमान म्हणाला, ' मराठी सिनेमे मला फार आवडतात, संधी मिळाली तर नक्की मराठी सिनेमाला संगीत द्यायला आवडेल. गेली पाच वर्ष मी भारतीय रागांवर अभ्यास करतोय. आजच्या तरूणांना रागदारी संगीत ऐकणं बोअर वाटतं. ते इंटरेस्टिंग कसं वाटेल यावर माझं काम सुरू आहे. त्यामुळे सिनेमांचं कामही मी कमी केलंय. पण संधी मिळाली तर मी नक्कीच मराठी सिनेमाला संगीत देईन.'

सिनेमात सुबोध भावे तृप्तीच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. सिनेमात दोन गलेलठ्ठ व्यक्तींमध्ये सुबोध भावे अडकलाय. त्याची फारच ओढाताण होतेय. या नाजुकाची सासू आहे  उषा नाडकर्णी. त्यामुळे सासू-सुनेची जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचं दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं.

सिनेमाचं गाणं अटक मटक चवळी चटक गाणं खूपच धमाल आहे. या धमाल गाण्यातून सिनेमाची कथाही समोर येते. आता 26 आॅक्टोबरपासून मनोरंजनाचा नवा डोस मिळणार असं दिसतंय.

सनी लिओन नवऱ्यासोबत एंजाॅय करतेय सुट्टी, शेअर केले PHOTOS

First published: October 14, 2018, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading