श्रद्धा झाली दाऊदची बहीण 'हसीना पारकर'

या सिनेमात ती एकेकाळी मुंबईवर राज्य करणाऱ्या दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरची भूमिका करतेय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2017 11:31 PM IST

श्रद्धा झाली दाऊदची बहीण 'हसीना पारकर'

21 जून : श्रद्धा कपूरच्या नव्या सिनेमाचं शुटिंग पूर्ण होत आलंय. या सिनेमात ती एकेकाळी मुंबईवर राज्य करणाऱ्या दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर ची भूमिका करतेय.

या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरवर सिनेमाच नाव होतं हसीना. आता मात्र निर्मात्यांनी सिनेमाचं नाव ठेवलंय 'हसीना पारकर'.

या सिनेमाच दुसरं पोस्टर रिलीज झालंय. या भूमिकेसाठी श्रद्धाने वजन ही वाढवलंय. हा चित्रपट आॅगस्टमध्ये रिलीज होतोय. या सिनेमाचे दिग्दर्शन अपूर्व लाखियाने केलंय.

तर नाहिद खान आणि स्विस एंटरटेनमेंट प्रोडयुस करतायत.

या सिनेमामधून श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर रूपेरी पडद्यावर एंट्री करतोय.गंमत म्हणजे तो सिनेमात दाऊद इब्राहिमची भूमिका वठवतोय.

Loading...

रियल लाईफ मधल्ये भाऊ-बहिण रील लाईफमध्ये ही भाऊ -बहिणीचाच रोल करतायत.आता बघू या ही भावा-बहिणीची जोडी लोकांच्या पसंतीस उतरते की नाही ते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...