लोकांच्या भावना जाणूनच पद्मावती रिलीज करा- हरयाणाच्या उद्योग मंत्र्यांचं स्मृती इराणींना पत्र

लोकांच्या भावना जाणूनच पद्मावती रिलीज करा- हरयाणाच्या उद्योग मंत्र्यांचं स्मृती इराणींना पत्र

हरियाणाचे उद्योग मंत्री विपुल गोयल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

12 नोव्हेंबर: पद्मावतीच्या वादात आता राजकारण्यांनीही उडी घेतली आहे. हरियाणाचे उद्योग मंत्री विपुल गोयल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

1 डिसेंबरला पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चितोडच्या राणी पद्मावतीच्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात अल्लाऊद्दीन खिलजी आणि पद्मावतीचे काही आक्षेपार्ह सीन्स दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ते सीन्स काढून टाकल्याची ग्वाही दिगदर्शकांनी दिली होती. पण तरीही सिनेमावर टीकेची झोड उठते आहे. म्हणूनच आता हरियाणाचे उद्योग मंत्री विपूल गोयल यांनी स्मृती इराणीला पत्र लिहिलं आहे. या सिनेमातील ऐतिहासिक वस्तूस्थिती आणि सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन सिनेमा रिलीज करण्याचा आग्रह त्यांनी केलाय. चित्रपटातील ऐतिहासिक वस्तूस्थितीची मोडतोड होऊ नये.

लोकांच्या भावनांचा आदर करुन संशोधनावरील चित्रपट प्रदर्शित करावेत आणि जो वाद सध्या चालू आहे तो संपवण्यात यावा असं हरियाणाचे उद्योग मंत्री विपुल गोयल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

आता सरकार यावर काय पाऊलं उचलतं हे पाहणं महत्तवाचं ठरेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 01:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading