मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

काळा कोटवाला हिरो, ‘निकम’ आता मोठ्या पडद्यावर!

काळा कोटवाला हिरो, ‘निकम’ आता मोठ्या पडद्यावर!

कसाबला फासापर्यंत पोहोचवणारे सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. 'निकम' नावाचा हा सिनेमा कोण करतंय वाचा...

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 07 फेब्रुवारी : मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा अजमल कसाबला (Ajmal Kasab) फासापर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या जीवनावर आधारित बॉलिवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘निकम’ असं असेल, अशी माहिती आहे. ‘Oh My God’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला (Umesh Shukla) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचीही माहिती आहे.

‘निकम’  (Nikam) नावाच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट अशा एका व्यक्तीची कथा आहे, ज्याने मुंबईमधील 1993 मधला साखळी बॉम्बस्फोट, 26/11 दहशतवादी हल्ला, गुलशन कुमार हत्या प्रकरण आणि भाजपा नेते प्रमोद महाजन हत्या प्रकरणांसारखी हाय प्रोफाइल केसेससाठी त्यांनी लढल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला या चित्रपटाची पटकथा लिहणार आहेत. दरम्यान, ‘मला गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या जीवनावर आधारित पुस्तक लिहण्यास किंवा चित्रपटाच्या निर्मितीसाठी विचारणा केली जात होती. माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. परंतु, यामधून अनेकांना प्रेरणा मिळेल अशी कथा सांगितली जाईल, त्यामुळे मी सहमती दर्शवली’ अशी भावना यावेळी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केली. दिग्दर्शक उमेश शुक्लाही या चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी अतिशय उत्सुक असून ‘निकम’ चित्रपटाची निर्मिती शुक्ला, सेजल शाह, आशीष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडालिया करणार आहेत.

26 नोव्हेंबर, 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मुंबईकरांसह, परदेशी नागरिकांचाही जीव गेला. तसेच, अनेक जवानही शहीद झाले. यावेळी दहशतवादी कसाबला जीवंत पकडण्यात यश आलं. याप्रकरणात उज्जवल निकम यांनी कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवलं.

अन्य बातम्या

युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाच्या बर्थ डे पार्टीत मराठी अभिनेत्रीसोबत छेडछाड

नेहा-आदित्यच्या लग्नाची तयारी सुरू, भाऊ टोनी कक्करनं शेअर केला VIDEO

First published:

Tags: Ujjwal nikam