या फिल्ममेकरने केला अजब संकल्प, डिसेंबरपासून शाहरूखच्या 'मन्नत'बाहेर ठोकला मुक्काम

या फिल्ममेकरने केला अजब संकल्प, डिसेंबरपासून शाहरूखच्या 'मन्नत'बाहेर ठोकला मुक्काम

अनेकजण मनावर घेतलेली गोष्ट पूर्ण करायला असामान्य जिद्द दाखवतात. या फिल्ममेकरचा संकल्प अशाच जिद्दीचा प्रत्यय देतो.

  • Share this:

मुंबई, 9 जानेवारी : नव्या वर्षात अनेकजण चांगले संकल्प (new year resolutions) करत असतात. यात काहीवेळा चित्रविचित्र संकल्पही दिसतात. एका बंगळुरूच्या फ्रिलान्स फिल्ममेकरनंसुद्धा असाच एक संकल्प केलाय.

या फ्रिलान्स फिल्ममेकरचं नाव आहे जयंत सिग्गी. जयंत यांनी यावर्षी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत (superstar Shahrukh Khan) फिल्म साईन करायचीच  केला आहे. ते केवळ संकल्प करूनच थांबले नाहीत. बंगळुरूचे (Banglore) जयंत सिग्गी मागच्या काही दिवसांपासून शाहरुख खानचं घर असलेल्या मन्नत (Mannat) बंगल्यासमोर ठाण मांडून बसले आहेत. त्यांना आपल्याकडं असलेली कथा शाहरुख खानला ऐकवायची आहे.

जयंत यांनी 'ह्युमन्स ऑफ बॉंबे'ला (humans of Bombay) एका मुलाखतीत सांगितलं, की मी ऑगस्टमध्ये शाहरुख खान यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला आपण 'झीरो'नंतर कुठलीच फिल्म साईन केली नसल्याचं सांगितलं. मी आश्र्चर्यचकितच झालो. विचार केला, की मी शाहरुख यांच्यासोबत फिल्म करू शकलो तर किती छान होईल. मी या मुव्हीचं पोस्टरही लगोलग बनवत ट्विटरवर (twitter) शेअर केलं.

(हे वाचा-क्रिकेटपटू इरफान पठाणचं सिनेसृष्टीत पदार्पण! 'COBRA' सिनेमात साकारणार ही भूमिका)

यानंतर काहीच घडताना दिसलं नाही, तेव्हा जयंत डिसेंबरमध्ये मुंबईला आले. तेव्हापासून ते शाहरुखच्या घरासमोरच मुक्काम ठोकून आहेत. अगदी 'मन्नत'च्या सिक्युरिटीसोबतही जयंत यांची आता मैत्री झाली आहे.

घरासमोर बसून ते ट्विटरवरही अपडेट्स शेअर करत असतात. आपल्या स्क्रिप्टचं नाव त्यांनी 'प्रोजेक्ट एक्स' ठेवलं आहे. आता त्यांचा संकल्प कधी पूर्ण होतो याची लोकांना उत्सुकता  राहिली आहे. शाहरुख माझा सिनेमा साईन करत नाहीत तोवर मी इथेच राहणार असा जाहीर संकल्प त्यांनी केला आहे.

शाहरुख खान बऱ्याच काळापासून फिल्मी पडद्यावर दिसला नाही. शाहरुख शेवटचा दिसला होता, तो 2018 साली आलेल्या 'झीरो' या सिनेमामध्ये.

Published by: News18 Desk
First published: January 9, 2021, 4:20 PM IST

ताज्या बातम्या