• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'शाहरुखला फोन लाव..' शोमध्ये फॅनची अक्षयकडे मागणी; कॉल केला पण...

'शाहरुखला फोन लाव..' शोमध्ये फॅनची अक्षयकडे मागणी; कॉल केला पण...

अक्षय कुमारने (Akshay Kumar) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी एक महिला फॅनने कार्यक्रमात अक्षयला शाहरुख खानला फोन लावण्याची विनंती केली.

 • Share this:
  मुंबई 24 ऑगस्ट : आपल्या आवडत्या स्टारला किंवा सेलेब्रिटीला भेटण्यासाठी चाहते काहीही करण्याची तयारी ठेवतात. तर आवडत्या दोन स्टार्सना एकत्र पाहण्याचा मोह देखील अनेक चाहत्यांना होतो. असच काहीसं ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) पाहायला मिळालं, जेव्हा अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी एक महिला फॅनने कार्यक्रमात अक्षयला शाहरुख खानला फोन लावण्याची विनंती केली. अक्षयने त्या फॅन ची इच्छा लक्षात घेऊन शाहरुख खानला फोन लावला. परंतु शाहरुख चा फोन बंद दाखवत होता. तेव्हा त्या महिलेने दुसऱ्या नंबरवर प्रयत्न करण्यास सांगितलं. तेव्हा शोचा होस्ट कपिल शर्मा ने म्हटलं की, ‘शाहरुख खान पिसिओत (PCO) काम करतो?’

  स्वीटू - मोहितच्या लग्नावर संतापले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

  पुढे ती महिला पुन्हा एकदा विचारते की, ‘सर आणखी कोणता नंबर नाही का?’ तेव्हा अक्षय म्हणतो, ‘मी दुसरा नंबर ट्राय करतो.’ यावर ती फॅन म्हणते की, ‘त्याची पत्नी गौरी खानला फोन लावा.’ तेव्हा सगळेच जन हसू लागतात. शेवटी त्या फॅनच शाहरुखशी बोलणं होत नाही. मात्र अक्षयच्या प्रयत्नांना ती धन्यवाद करते.
  अक्षय त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बेल बॉटम’च्या  (Bell Bottom) प्रमोशनसाठी या शोमध्ये आला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची कोस्टार वानी कपूर देखील होती. तसेच चित्रपटाचा प्रोड्युसर जॅकी भगनानी देखील होता. दरम्यान अक्षय आणि शाहरुख ने दिल तो पागल है या चित्रपटात एकत्र काम केलं होत. त्यानंतर तो शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात कमियो करताना दिसला होता. तर अनेकदा चाहत्यांनी त्यांना एकत्र कोलाबोरॅशन करण्याचाही सल्ला दिला आहे.
  Published by:News Digital
  First published: