मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नानंतर काही तासातच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; 37 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लग्नानंतर काही तासातच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; 37 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध गायक जेक फ्लिंट

प्रसिद्ध गायक जेक फ्लिंट

गेल्या काही काळापासून मनोरंजन सृष्टीतून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहे. अशातच आणखी एका गायकाचं निधन झाल्याची बातमी समोर आलीये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 1 डिसेंबर : गेल्या काही काळापासून मनोरंजन सृष्टीतून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहे. अशातच आणखी एका गायकाचं निधन झाल्याची बातमी समोर आलीये. देशातील प्रसिद्ध गायक जेक फ्लिंटचं निधन झालं आहे. गायकाने लग्नानंतर काही तासांतच जगाचा निरोप घेतला. जेक फ्लिंटच्या निधनाची बातमी समोर येताच त्याचे चाहते, कुटुंब, मित्र-परिवाराला धक्काच बसला. त्यांच्या जाण्यामुळे हॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून शोककळा व्यक्त केली जात आहे.

गायक जेक फ्लिंटने 26 नोव्हेंबर रोजी लग्न केलं होतं. मात्र काही तासातच त्याने झोपेत जगाचा निरोप घेतला. जेकने 37 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गायकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. जेकच्या निधनानंतर पत्नी ब्रेंडानेही फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायकाच्या पत्नीने लिहिलं, 'आम्ही दोघांनी आता आमच्या लग्नाचे फोटो पाहिले पाहिजेत, परंतु या क्षणी मला माझ्या पतीचे कोणते कपडे पुरायचे याचा विचार करावा लागेल. खूप त्रास होतोय. माझे हृदय तुटले आहे आणि मला त्याची गरज आहे. मला हे सहन होत नाही. मला तो परत हवा आहे.' त्यामुळे जेकची पत्नी सध्या मोठ्या सदम्यात आहे.

जेकच्या मॅनेजर ब्रेंडा क्लाईनने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत जेकच्या निधनाच्या बातमीची पृष्टी केली आहे. त्या म्हणाल्या जेक माझ्या मुलासारखा होता. त्याचे जाणे ही मोठी शोकांतिका आहे. जेकच्या जाण्यामुळे चाहतेही खूप दुःखी असून त्याला आदरांजली वाहत आहेत.

दरम्यान, जेक फ्लिंटने 2016 मध्ये गायनात पदार्पण केले. त्याच्या पहिल्या अल्बमचे नाव आय एम नॉट ओके होते. त्याचा दुसरा अल्बम 2020 मध्ये आला, ज्याला त्याने स्वतःचे नाव दिले होते. त्याची फायरलाईन, व्हॉट्स युवर नेम, अशी बरीच गाणी प्रसिद्ध आहे. तो कायमच त्याच्या गाण्यामुळे चर्चेत असायचा. त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Hollywood, Singer