VIDEO : 25 फेब्रुवारीला सुशांतच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसात केली होती तक्रार; वडिलांच्या दाव्याने खळबळ

VIDEO : 25 फेब्रुवारीला सुशांतच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसात केली होती तक्रार; वडिलांच्या दाव्याने खळबळ

सुशांत सिंहच्या वडिलांनी केलेल्या या दाव्यानंतर आता खळबळ उडाली आहे

  • Share this:

पाटना, 3 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये तपासावरुन मतभेद सुरू आहे. यातच आता सुशांतचे वडील व्हिडीओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडीओमध्ये खळबळजनक दावा केला आहे.

सुशांतचे वडील या व्हि़डीओमध्ये म्हणतात की -25 फेब्रुवारी रोजी सुशांत संकटात असल्याचे मी मुंबई पोलिसांना सांगितले होते. 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबई पोलिसांनी 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत दिलेल्या नावांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याच्या मृत्यूच्या 40 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी पाटण्यात एफआयआर दाखल केला.

पाटण्यात सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले असून ते त्यांच्यापरीने या प्रकरणाचा तपास करीत आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनी आणि रिया चक्रवर्तीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी बिहार पोलिसांनी मुंबईत तपासाबाबत नकार दर्शवला आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, सुशांत आत्महत्येच्या एक आठवडाआधी सतत तीन गोष्टी गुगल सर्च करत होता. सुशांत गुगलवर सर्च करत असलेल्या गोष्टी या- न्यूज रिपोर्टमध्ये आपलं नाव, त्याची मॅनेजर दिशा सालियनचे नाव आणि आपल्या आजाराबाबत. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, 14 जून रोजी म्हणजेच आत्महत्येच्या दिवशी सुशांतने गुगलवर आपले नाव सर्च केले होते.

Published by: Meenal Gangurde
First published: August 3, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या