मुंबई, 23 सप्टेंबर : अनुराग कश्यप-पायल घोष प्रकरणात (Anurag Kashyap and Payal Ghosh case) सातत्याने अनुरागला चित्रपटसृष्टीतून पाठिंबा मिळत आहे. सेक्रेड गेम्सची अभिनेत्री राजश्री देशपांडेनंतर आता या सीरिजमधील एलनाज नौरोजीनेही समोर येऊन अनुराग कश्पचं समर्थन केलं आहे.
तिने इन्टाग्रामवर पोस्ट करीत आपलं म्हणणं व्यक्त केलं आहे. ज्यात तिने म्हटलं आहे की, अनुराग एक निर्माता-दिग्दर्शक म्हणून सेक्रेड गेम्ससारखा सेक्स सीन करू इच्छित होते, मात्र तसा सीन करणं मला शक्य होत नव्हतं. त्यावेळी अभिनेत्री त्या सीनमुळे अस्वस्थ झाली (not comfortable) होती. यानंतर अनुरागने अभिनेत्रीची अस्वस्थता पाहून तो सेक्स सीन बदलला. यावर अभिनेत्री म्हणते की, मी अस्वस्थ असल्याचे पाहून अनुरागने तिला मॅसेज केला होता. यात लिहिलं होतं की, तू याचा फार विचार करू नको..दु:खी होऊ नकोस..मी सर्व बघतो..माझ्यावर विश्वास ठेव..एलनाजने सांगितल्यानुसार शूटिंगचा दिवस आल्यानंतर तिचं टेंशन वाढलं होतं. मात्र अनुरागने सर्व बाबी व्यवस्थित हाताळल्या हे पाहून तिला खूप भरुन आलं.
या अभिनेत्रीने लिहिलं पायल घोषला ओपन लेटर
यापूर्वी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या पायल घोषण हिला मंगळवारी एक ओपन लेटर लिहिलं होतं. यामध्ये तिने लिहिलं होतं की, जर अनुराग कश्यप चुकीचे असतील तर त्यांना शिक्षा मिळाले. मात्र मीटूच्या आडून जर कोणी खोटं बोलत असेल तर यामुळे हे अभियान कमकुवत होईल.
घोषने शनिवारी ट्विटरवर दावा केला होता की, कश्यपने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. मात्र कश्यपने हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood