99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगणार नागपूरमध्ये

99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगणार नागपूरमध्ये

22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन नागपूरमध्ये रंगणार आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : 99वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन नागपूरमध्ये रंगणार आहे. नागपूर की यवतमाळ अशी चर्चा असताना आता मुख्यमंत्र्यांचं शहर असणाऱ्या नागपूरला संमेलनाचा मान मिळालाय.

यावेळी प्रेमानंद गज्वी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या नाट्य संमेलनात काय काय कार्यक्रम असतील याची उत्सुकता नाट्य रसिकांना आहे.

गेल्या वेळचं नाट्य संमेलन मुलुंड इथे झालं. सलग तीन दिवस नाॅन स्टाॅप हे संमेलन सुरू होतं. समारोप कार्यक्रमाला शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

नाट्य संमेलनात पहिल्यांदाच सलग 60 तास विविध कार्यक्रम सादर करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. मराठी बाणा, संगीत सौभद्र, पंचरंगी पठ्ठेबापूराव, लोकककलांचा जागर, रंगबाजी असे सगळे कार्यक्रम या तीन दिवसांमध्ये सादर झाले. बालनाट्यांनी धमाल केली. आणि तीन दिवस प्रत्येक पहाट दिग्गजांच्या स्वरांनी सुरेल झाली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज ठाकरे आणि शरद पवार उपस्थित होते. तर समारोप उद्धव ठाकरेंच्या उपस्थित झाला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते संमेलनाच्या स्मरणिकेचं विमोचन करण्यात आलं.


Year Ender 2018 : सोयराबाई साकारताना स्नेहलताला मन घट्ट करावं लागतं कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 07:23 PM IST

ताज्या बातम्या