मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

83 Trailer: वर्ल्डकपची फायनल सुरू असताना कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांनी का सोडलं होतं मैदान?

83 Trailer: वर्ल्डकपची फायनल सुरू असताना कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांनी का सोडलं होतं मैदान?

83 Trailer Out: 83 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच भारतीय क्रिकेट इतिहासातील त्या सोनेरी आठवणीही ताज्या झाल्या, ज्या कथा ऐकताना देशातील अनेक मुलांनी क्रिकेटची बॅट हाती घेतली. या वर्ल्डकपचा अंतिम सामन्यात भारत जिंकेल असं खुद्द कर्णधार कपिल देव (kapil dev) यांच्या पत्नीलाही वाटत नव्हते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: कोट्यवधी भारतीयांची प्रतीक्षा संपली असून 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित 83 या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. कॅप्टन कपिल देवच्या (kapil dev) भूमिकेत रणवीर सिंग (Ranveer Singh) असा इतका चपलख बसलाय की चाहत्यांना डोळ्यांवर विश्वास बसेना. चालण्यापासून ते केस आणि बोलण्याच्या शैलीत रणवीर कपिल पाजीसारखा दिसतोय, तर दीपिका पदुकोण (deepika padukone) त्यांची पत्नी रोमीच्या भूमिकेत दिसत आहे. रणवीर-दीपिका हे खऱ्या आयुष्यातील जोडपं आहे, त्यामुळे पडद्यावरील दोघांची केमिस्ट्री लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांची पत्नी रोमी यांनी भारताच्या जिंकण्याची आशा सोडून दिल्या होत्या.

पत्नीनेही विजयाची आशा सोडली होती

9 ते 25 डिसेंबर दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा तिसरा मोसम खेळला गेला. दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ज्या भारतीय संघाला सर्वजण हलक्यात घेत होते, त्या भारतीय संघाने अंतिम फेरी गाठून सर्वांनाच चकित केलं होतं. तरीही क्रिकेट पंडितांनी या संघाला साफ नाकारलं होतं. इथपर्यंत पोहोचणे हा निव्वळ योगायोग असल्याचे ते सांगत होते. खुद्द कपिल देव यांच्या पत्नीनेही फायनल जिंकण्याची आशा सोडली होती.

जेव्हा भारतीय क्रिकेटपटूंच्या बायका हॉटेलमध्ये परतल्या

विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंचे कुटुंबही त्यांच्यासोबत होते. कपिल यांची पत्नी रोमी भाटिया आणि मदन लाल यांची पत्नी अनु स्टेडियममधून टीमला चीअर करत होत्या. भारतीय संघाचा पराभव पाहून दोघीही रागाच्या भरात स्टेडियमजवळील हॉटेलमध्ये परतल्या. नंतर जेव्हा त्यांना स्टेडियममधून आवाज ऐकू येऊ लागला तेव्हा त्यांनी लगेच टीव्ही चालू केला. पाठीमागे धावत रिचर्ड्सचा झेल पकडताना कपिल यांना पाहताच रोमी यांनी आनंदाने इतका मोठा आवाज केला की हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना वरच्या मजल्यावर यावं लागलं.

83 Trailer Out: स्वातंत्र्यानंतर परकीय भूमीवर असा मिळाला सन्मान; '83' चा ट्रेलर पाहून प्रेक्षक म्हणाले ,'HIT' आहे

शॅम्पेन उडवताना आली बायकोची आठवण

कपिल यांनी हा किस्सा अनेकदा सांगितला आहे. ते म्हणाले, की 'विजयानंतर आम्ही ज्या दिशेने शॅम्पेन उडवत होतो, त्याच त्याच बाजूला त्या दोघी बसल्या होत्या. पण, ती स्टेडियममधून हॉटेलवर परतली होती हे मला माहीत नव्हतं. नंतर आम्ही भेटलो तेव्हा आमच्या विजयाच्या वेळी ती लॉर्ड्सवरही नव्हती हे सांगण्याचे धाडस तिला झालं नाही. त्यानंतर अनियंत्रित गर्दीमुळे दोघींना इच्छा असूनही पुन्हा स्टेडियममध्ये प्रवेश करता आला नाही.

असा होता फायनलचा थरार

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सुनील गावस्कर लवकर आऊट झाले. श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर संपूर्ण संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि धावफलकावर केवळ 183 धावाच लावू शकले. वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. त्यांच्या 1 बाद 50 धावा झाल्या होत्या. व्हिव्हियन रिचर्ड्स आक्रमक खेळी खेळत होता, पण मदनलालच्या त्या षटकाने सामन्याची दिशाच बदलून टाकली.

फायनलचा थरार आता चित्रपटगृहात दिसणार

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयाच्या कथेवर आधारित आहे. त्यावेळी कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. या चित्रपटात ते लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. पुन्हा एकदा रणवीरने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

First published:

Tags: Deepika padukone, Ranveer singh