मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'83' चित्रपट थिएटर नंतर आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार का? रंगली चर्चा

'83' चित्रपट थिएटर नंतर आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार का? रंगली चर्चा

 बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित ‘83’ हा थिएटर्समध्ये हिट ठरतोय. त्यामुळे आता चाहत्यांना तो कोणत्या ओटीटीवर येणार याची उत्सुकता आहे.

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित ‘83’ हा थिएटर्समध्ये हिट ठरतोय. त्यामुळे आता चाहत्यांना तो कोणत्या ओटीटीवर येणार याची उत्सुकता आहे.

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित ‘83’ हा थिएटर्समध्ये हिट ठरतोय. त्यामुळे आता चाहत्यांना तो कोणत्या ओटीटीवर येणार याची उत्सुकता आहे.

  मुंबई, 28 डिसेंबर: आजकाल बहुतेक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातात किंवा थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर काही दिवसांतच एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. अशीच चर्चा सध्या रंगली आहे ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 83 चित्रपटाबद्दल (83 Movie). बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh), अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तगड्या स्टारकास्टसह बहुप्रतिक्षित ‘83’ हा थिएटर्समध्ये हिट ठरतोय. त्यामुळे आता चाहत्यांना तो कोणत्या ओटीटीवर येणार याची उत्सुकता आहे.

  देशातील जवळपास 3741 चित्रपटगृहांत ‘83’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हापासूनच क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षणांवर आधारित या चित्रपटाची उत्सुकता होती. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही वाहवा मिळाली आहे. त्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, हा सिनेमा एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नक्कीच रिलीज करण्यात येईल. कारण सध्या तशी परंपराच जणू बॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे. रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉमने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  कारण ज्यांना ‘83’ हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहणं शक्य नाही. ते प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. पण अजूनही चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. खरं तर अनेकदा चित्रपटाचे ओटीटी प्रदर्शनाचे हक्क हे आधीच एखाद्या प्लॅटफॉर्मला दिले जातात.

  पण हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येईल, याबाबतही काही संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अजूनतरी ओटीटीच्या प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

  बातम्यांनुसार, असं कळतंय की, निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याबाबत ना नेटफ्लिक्सशी (Netflix) चर्चा केली आहे ना अमेझॉन प्राईम व्हिडिओशी, ना डिज्नी हॉटस्टार किंवा झी5 सारख्या प्लॅटफॉर्मशी चर्चा केली आहे. यामागील कारण हेही असू शकतं की, सध्या हा सिनेमा थिएटर्समध्ये जोरदार गर्दी खेचत आहे.

  ‘83’ सिनेमाचं प्रदर्शन हे कोरोना प्रतिबंधांमुळे बऱ्याच काळापासून लांबणीवर गेलं होतं. कारण आधी हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार होता. भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. त्यामुळे या चित्रपटातील तगडी स्टारकास्ट असो वा रणवीर सिंगच्या हुबेहूब कपिल देव लूकची चर्चा असो. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता आहे. आता पाहूया हा सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो ते.

  First published:
  top videos

   Tags: Bollywood, Deepika padukone, Ranveer singh