VIDEO- मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदग सिंग संधू जेव्हा ‘नशे सी चढ गयी’ गाण्यावर नाचतात

VIDEO- मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदग सिंग संधू जेव्हा ‘नशे सी चढ गयी’ गाण्यावर नाचतात

गेल्या काही दिवसांपासून धर्मशाला क्रिकेट स्टेडियममधील कलाकारांचे ट्रेनिंगचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

  • Share this:

धर्मशाला, ८ एप्रिल- बॉक्स ऑफिसवर एकामागोमाक एक हिट सिनेमे देणारा रणवीर सिंग सध्या यशाच्या शिखरावर आहे. पण त्याला इथेच थांबायचं नाहीये. त्यामुळेच तो सध्या आगामी '८३' सिनेमासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं. याच विषयावर हा सिनेमा आधारित आहे.

या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरशिवाय साकिब सलीम, आदिनाथ कोठारे, ऐमी विर्क, हार्डी संधू, जीवा, ताहिर भसी, पंकज त्रिपाठी साहिल खट्टर यांसारखे कलाकार १९८३ च्या क्रिकेट टीममधील खेळाडूंची भूमिका साकारणार आहेत.

सध्या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट धर्मशाला येथे क्रिकेटचं ट्रेनिंग घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मशाला क्रिकेट स्टेडियममधील कलाकारांचे ट्रेनिंगचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात रणवीर सिंग दिग्गज क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ आणि बलविंदर सिंग संधू यांच्यासोबत ‘नशे सी चढ गई’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

रणवीर सोशल मीडियावर फार सक्रीय असतो. नुकताच त्याने कपिलसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तो कपिल देव यांच्याकडून क्रिकेट ट्रेनिंग घेताना दिसत आहे.

First published: April 8, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या