VIDEO- क्रिकेट ग्राउंडवर रणवीर गाळतोय घाम तर दीपिका इन्स्टाग्राममध्ये बिझी

कपल गोल्स असतात तरी काय, हेच जणू ही जोडी प्रत्येक दिवशी नव्याने सांगते. आताही ही जोडी चर्चेत आली आहे ते म्हणजे आगामी सिनेमा आणि त्यांच्या केमिस्ट्रीमुळे

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 04:12 PM IST

VIDEO- क्रिकेट ग्राउंडवर रणवीर गाळतोय घाम तर दीपिका इन्स्टाग्राममध्ये बिझी

नवी दिल्ली, 14 जून- दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या प्रेमकहाणीच्या अगदी सुरुवातीपासून ते आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक दिवशी या जोडीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. मुळात कपल गोल्स असतात तरी काय, हेच जणू ही जोडी प्रत्येक दिवशी नव्याने सांगते. आताही ही जोडी चर्चेत आली आहे ते म्हणजे आगामी सिनेमा आणि त्यांच्या केमिस्ट्रीमुळे.

कबीर खान दिग्दर्शित 83 या सिनेमातून दीप-वीर एकत्र झळकणार आहेत. तसं रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. पण, लग्नानंतर ते दोघंही पहिल्यांदा एकाच सिनेमातून झळकणार आहेत. तेव्हा रिअल लाईफ जोडीची ही रील लाईफ केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. किंबहुना त्याची सुरुवातही झाली आहे.

हेही वाचा- फॅनने विकीला पाहूनही दाखवली नाही ओळख, विकीने दिले सोशल मीडियावर उत्तरLoading...


 

View this post on Instagram
 

@deepikapadukone is a supportive wife, and here’s proof😇 . . . . . #entertainment #indotcom #ranveersingh #deepikapadukone #kapildev #83 @ranveersingh


A post shared by IN.com (@indotcom) on

हेही वाचा- तब्बू समोर ढसाढसा रडला होता सलमान खान, स्वतःनेच सांगितलं कारण

दीपिका सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती रणवीरसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. आताही तिने असंच काहीसं केलं. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रणवीर चित्रपटातील भूमिकेसाठी सराव करताना दिसत आहे, तर दीपिका त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राउंडमध्ये बसली आहे. तिने या व्हिडिओला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दीप- वीरची ही केमिस्ट्री गाजतेय असं म्हणायला हरकत नाही.

कबीर खानच्या दिग्दर्शकनात साकारणाऱ्या या सिनेमात दीपिका आणि रणवीर यांच्याव्यतिरिक्त साहिल खट्टर, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, साकिब सलीम हे कलाकारही झळकणार आहेत. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाची विजयी गाथा या सिनेमातून साकारण्यात आली आहे.

हेही वाचा- विराटसाठी काहीपण! त्याला भेटता यावं म्हणून अनुष्का करतेय तारेवरची कसरत

VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...