मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: रणवीर सिंहच्या '83' चित्रपटाचे दुसरे गाणे 'BIGADNE DE' रिलीज

VIDEO: रणवीर सिंहच्या '83' चित्रपटाचे दुसरे गाणे 'BIGADNE DE' रिलीज

Ranveer Singh

Ranveer Singh

अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित ’83’ चित्रपटातील दुसरं साँग बिगडने दे' (BIGADNE DE) नुकतेच रिलीज झाले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 13 डिसेंबर: अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित ’83’ चित्रपटातील दुसरं बिगडने दे' (BIGADNE DE) साँग नुकतेच रिलीज झाले आहे. रणवीरने ही माहिती त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे. हे साँग रिलीज होतीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रिलीज करण्यात आलेल्या 'बिगडने दे' या गाण्यांमध्ये क्रिकेटच्या मैदानात भारतीय खेळाडूचा आत्मा दाखवण्यात आला आहे. हे गाणे बेनी दयाल यांनी गायले असून प्रीतमने संगीत दिले आहे. गाण्याचे बोल आशिष पंडित यांनी लिहिले आहेत.

रणवीरने हे गाणे इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहे.

चार दिवसांपूर्वी, लेहरा दो..हे चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले होते. हे गाणे देशभक्तीने भरलेले आहे. भावनांनी भरलेले लेहरा दो हे गाणे 1983 च्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या खराब कामगिरीने सुरू झालेल्या भारतीय संघाच्या विजयी प्रवासाचे चित्रण करते. पण शेवटी विजयाची नोंद करून सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले.

हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. देशभक्तीने भरलेले हे गाणे अरिजित सिंगने आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. या गाण्याचा टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेता रणवीर सिंगने कॅप्शन लिहिले, गौरवासाठी सज्ज व्हा. यासोबतच त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहितीही शेअर केली आहे.

चित्रपट 83 यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

विविध भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये क्रिकेट वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला होता. या ऐतिहासिक विजयावर आधारित या ‘८३’ चित्रपटाची कथा आहे. त्यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारत त्यावेळी ‘चॅम्पियन’ झाला होता. हा सिनेमा हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमातील कपिल देव यांच्या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंहची निवड केली. कपील देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पादूकोण दिसणार आहे.

रणवीर आणि दीपिका यांच्या व्यतिरिक्त सिनेमात आर बद्री, हार्डी संधू, चिराग पटेल, आदिनाथ कोठारे, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, ताहिर भसीन, साहिल खट्टर आणि Ammy Virk यांसारखे कलाकार टीम इंडियातील क्रिकेटपटूंच्या मुख्य भूमिका साकारताना दिसतील.

First published:

Tags: Deepika padukone, Ranveer singh