Challenge! 8 हॉरर फिल्म्स पाहा; तुम्हाला घाम फुटला नाही तर सांगा

Challenge! 8 हॉरर फिल्म्स पाहा; तुम्हाला घाम फुटला नाही तर सांगा

भुत म्हटलं की बऱ्याच जणांना मजा वाटते तर काही जण घाबरतात पण याच भुतांचे सर्वात जास्त गाजलेले 8 चित्रपट माहीत आहेत का?

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : अनेकांना भुतांचे चित्रपट पाहायला आवडतं. तर काही जण मात्र अशा चित्रपटांना खूप घाबरतात. असे काही चित्रपट आहेत त्यामधील पात्रं खूप लोकप्रिय झाली असून, आज अशाच चित्राटांविषयी जाणून घेऊ.

1) The Addams Family

1991 मध्ये बॅरी सोनफिल्ड यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 1964 मध्ये आलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित होता. विक्षिप्त अशा अॅडम्स कुटुंबाला आपण त्यांचा हरवलेला भाऊ गोमेझ अॅडम्स असल्याचं सांगून त्यांचा फायदा घेणाऱ्या अंकल फेस्टरची कथा यात होती. अँजेलिका ह्युस्टन, ख्रिस्तोफर लॉइड यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

2)Edward Scissorhands

जॉनी डीप आणि विनोना रायडर यांची भूमिका असलेला हा सिनेमा 1990 मध्ये रिलीज झाला होता. ही कथा देखील मोठी रंजक असून रोमँटिक आणि थ्रिलर सिनेमा आजदेखील तितक्याच आवडीने पहिला जातो. एका शास्रज्ञाने humanoid तयार केलेला असतो पण त्या हुमनॉइडचे हात तयार करण्यापूर्वीच शास्रज्ञाचा मृत्यु होतो आणि त्या ह्युमनॉडच्या हातांच्या जागी कात्री बसवली जाते त्यामुळे उद्भवलेली भयावह स्थिती या चित्रपटात दाखवली आहे.

3)Beetlejuice

1988 आलेल्या या क्लासिक सिनेमामध्ये एका जोडप्याची कथा सांगण्यात आली आहे. टीम बर्टन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातील ऍडम आणि बार्बरा हे दोघे आपलं घर सोडण्यास तयार नसतात. त्यामुळं मृत्यूनंतर देखील ते घरातील व्यक्तींना त्रास देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये मायकेल किटन, गीना डेव्हिस, अलेक बाल्डविन आणि विनोना रायडर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

4)Hocus Pocus

केनी ऑर्टेगा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 1993 मध्ये आला होता. या सिनेमाची कथा जादूटोणा आणि भुताटकीवर आधारित आहे. यामध्ये 300 वर्षांपूर्वी या तीन बहिणींना जादूटोणा करण्यावरून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली असते. मात्र काही वर्षांनंतर मॅक्स डेनिसन हा चुकून या तिघी बहिणींना जिवंत करतो. त्या अमरत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना रोखण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे चित्रपटात दाखवलंय.

5)Scream

सत्य कथेवर आधारित हा सिनेमा 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. डॅनी रोलिंग नावाच्या सीरिअल किलरवर आधारित हा सिनेमा असून यामध्ये तो विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा खून करत असतो. यामध्ये नेव्ह कॅम्पबेल, कोर्टनी कॉक्स, डेव्हिड आर्क्वेट, ड्र्यू बॅरीमोर आणि मॅथ्यू लिलार्ड यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

6)Bride of Chucky

एका बाहुलीमध्ये सीरियल किलरचा आत्मा प्रवेश करतो. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला वाचवल्यानंतर तो तिला देखील मारून बाहुलीच्या रूपात जिवंत करतो व ते दोघं मिळून खून करतात असं कथानक आहे. रॉनी यू यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता तर जेनेफर टिली आणि ब्रॅड डॉरफिट यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

7)Jennifer’s Body

रक्त पिणाऱ्या जेनेफर नावाच्या मुलीवर हा चित्रपट आधारित आहे. शाळेत शिकणारी ही चिअरलिडर माणसांचे रक्त पित असते. जेनेफर तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला मारण्याचा प्रयत्न करते असं या चित्रपटाचं कथानक आहे. या सिनेमात काम करताना जेनेफरची जीभ भाजली होती. त्यामुळं हे दृश्य देखील अजरामर झालं होतं.

8)Warm Bodies

2013 मध्ये आलेल्या या रोमँटिक भयपटात झोंबीचे आयुष्य दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात असणारी अभिनेत्री आणि तिचा बॉयफ्रेंड जेव्हा वैद्यकीय मदतीसाठी बाहेर पडतो. त्यावेळी त्यांच्यावर झोंबीचा ग्रुप हल्ला करतो. मात्र यामध्ये ते वाचतात. पण त्यांच्या आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतात हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 23, 2020, 10:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या