मुंबई 25 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्रींना आता प्रेगनन्सी दरम्यान काम करणं हे नवं राहिलं नाही. तर बेबी बंप (Baby Bump) फ्लाँट करत काम करणं हा नवा ट्रेंड देखील सेट झाला आहे. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), नेहा धूपिया (Neha Dhupia) याची काही उदाहरणे आहेत. दरम्यान नेहा दुसऱ्यांदा आई होत आहे. विशेष म्हणजे नेहा वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होतेय. पण नेहाच काम मात्र सुरूच आहे.
नेहाने तिच्या आगामी चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान 8 महिन्यांची गर्भवती नेहा जोमाने शूटिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने पती आंगद बेदीसोबत (Angad Bedi) ही गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता आठव्या महिन्यातही नेहा काम करताना दिसतेय.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच ती तिचा ‘सनकी’ या चित्रपटासाठी डबिंग करताना दिसली होती. तर नुकतेच तिने काही फ्रेश फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती शूटिंग करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. तिच्या आगामी चित्रपटासाठी ती चित्रीकरण करत आहे. तिच्या चित्रपटातील हा फर्स्ट लूक आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
फोटोंमध्ये नेहा अगदी रफ अँड टफ अवतारात दिसत आहे. तिचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं आहे. एका अकल्पनीय कथेवर आधारीत हा चित्रपट असून नेहा त्यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment