• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 70 टक्के कमाई गेली होती पाण्यात; जेव्हा प्रॉपर्टी डिलरच्या जाळ्यात अडकला होता सैफ अली खान

70 टक्के कमाई गेली होती पाण्यात; जेव्हा प्रॉपर्टी डिलरच्या जाळ्यात अडकला होता सैफ अली खान

जाणून घ्या काय आहे तो किस्सा...

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर : सैफ अली खान हा राणी मुखर्जीसह (Saif Ali Khan and Rani Mukherjee) चित्रपट 'बंटी आणि बबली 2' (Bunty and Bubbly 2) या चित्रपटात दिसणार आहेत. अशात अभिनेता आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनची मोठी तयारी सुरू आहे. या चित्रपटात सैफ बंटीची भूमिका साकारणार आहेत. जो एकेकाळी एक कुप्रसिद्ध स्कॅमर होता. ज्याची क्राईम पार्टनर बबली होती. सैफ अली खानने नुकतच सांगितलं की, चित्रपटात तो एक प्रसिद्ध स्कॅमर म्हणून काम करीत आहे. मात्र खऱ्या आयुष्यातही त्यांच्यासोबत अशा प्रकारची घटना घडली आहे. (70 percent loss of earnings When Saif Ali Khan was caught in the trap of property dealer) सैफ अली खानने सांगितलं की, काही वर्षांपूर्वी त्याच्यासोबत असाच प्रकार घडला होता. सैफने सांगितलं की, त्याने एका प्रॉपर्टीत गुंतवणूक केली होती. ज्यामुळे त्याची 70 टक्के कमाई लुटली गेली. हे सर्व प्रॉपर्टीच्या कारणास्तव झालं होतं. सैफने सांगितलं की, मला सांगण्यात आलं की, प्रॉपर्टी 3 वर्षात तयार होईल. मात्र आतापर्यंत मला ती प्रॉपर्टी मिळू शकली नाही. मी त्या काळात जितकं कमावलं होतं, त्यातील 70 टक्के गमावलं होतं. हे ही वाचा-अरबाज खानच्या गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर हवा; बोल्ड BIKINI फोटो झाले VIRAL यापूर्वी सैफने सांगितलं होतं की, एकेदिवशी त्याच्या घरात अनोळखी महिला आली होती. हा किस्सा शेअर करीत सैफने सांगितलं की, त्यावेळी करिना कपूर खूप नाराज झाली होती.

  Published by:Meenal Gangurde
  First published: