Home /News /entertainment /

'सगळे बदलले फक्त अंकुश चौधरी नाही...', सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केलेल्या फोटोवर चाहत्याची चाभन्नट कमेंट

'सगळे बदलले फक्त अंकुश चौधरी नाही...', सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केलेल्या फोटोवर चाहत्याची चाभन्नट कमेंट

मराठीतील मोठी स्टारकास्ट असलेला क्लासमेट या सिनेमाला आज, 16 जानेवारीला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने क्लासमेटमधील कलाकारांसोबत एक जुना फोटो शेअर केला आहे.

  मुंबई, 16 जानेवारी- मराठीतील मोठी स्टारकास्ट असलेला क्लासमेट (Classmates )या सिनेमाला आज, 16 जानेवारीला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने  (Siddharth Chandekar)क्लासमेटमधील कलाकारांसोबत एक जुना (7 years  Classmates ) फोटो शेअर केला आहे. त्यानं हा फोटो शेअर करताच अनेकांना चित्रपटातीला डायलॉग तर काहींना कॉलेजचे दिवस आठवत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित `क्लासमेट’ या सिनेमात प्रेम, मैत्री, जल्लोष, थरार संगीत याचा संगम दाखवण्यात आला. 2006मध्ये आलेल्या 'क्लासमेट' या मल्याळम सिनेमाचा हा मराठी रिमेक होता. हा सिनेमा तरुणाईचा असला तरी तो वेगळ्या धाटणीचा होता. या सिनेमातील डायलॉग आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. आज या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सिद्धार्थनं एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, सचित पाटील, सुशांत शेलार, अंकुश चौधरी दिसत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर हार्ट इमोजी पोस्ट करत सिनेमाबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. तर काहींनी हा सिनेमा परत पाहायचा आहे असं देखील म्हटलं आहे. काहींनी यारीया तर काहींनी याचा दुसरा भाग पाहायला आवडेल असं देखील म्हटलं आहे. शिवाय एकाने म्हटलंय की, सगळे बदलले फक्त अंकुश चौधरी नाही.
  सिद्धार्थ चांदेकर असेल किंव अन्य कलाकार यांच्यात आता फार बदल झाला. या सिनेमानंतर अनेकांच्या करिअरची गाडी सुसाट धावली. त्यापैकी एक नाव सिद्धार्थ चांदेकर आहे. सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो पत्नीसोबत काही व्हिडिओ तसेच फोटो व आगामी प्रोजक्टची माहिती शेअर करत असतो. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील छोटे उस्ताद या शोचे होस्टिंग करताना दिसत आहे. त्याच्या छिम्मा या सिनेमाने देखील कमाईचे आणि प्रसिद्धीचे सर्व उच्चांक मोडले आहेत. यामधील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. वाचा-सरिता वहिनींकडे गुड न्यूज, आता अवनीच्या बाळाचं काय होणार? 1994चा कालावधी या सिनेमातून दाखविण्यात आला होता. 16 जानेवारी 2015 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफीसवर 21 कोटीचा गल्ला या सिनेमाने केला होता. तर सिनेमाचे बजेट 5 कोटीच्या घरात होते. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, सचित पाटील, सुशांत शेलार, अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या