साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

इनकम टॅक्स विभागानं विजयच्या घरावर छापा टाकल्यामळे त्याला तमिळनाडूमधील सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडून परतावं लागलं.

  • Share this:

चेन्नई, 06 फेब्रुवारी : साऊथ सुपरस्टार विजय सध्या कर चोरी प्रकरणात अडकला आहे. इनकम टॅक्स विभागानं विजयच्या घरावर छापा टाकल्यामळे नुकतंच त्याला तमिळनाडूमधील सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडून परतावं लागलं. रिपोर्टनुसार विजय सोबतच आणखी एक प्रोड्युसर आणि फायनान्सरच्या मदुराई आणि चेन्नईच्या घरांवर आयकर विभागानं छापा टाकला.

ANI नं दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये आतापर्यंत 65 कोटी रुपये जप्त करण्यात आले आणि अद्याप ही कारवाई संपलेली नाही.कर चुकवल्याच्या संशयावरुन AGS सिनेमावर होत असलेल्या कारवाई संदर्भात अभिनेता विजयची चौकशी केली जात होती. AGS सिनेमानं विजचा मागचा सिनेमा बिजलची निर्मिती केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. जगभरात या सिनेमानं 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

आयकर विभागनं 5 फेब्रुवारीपासून AGS इंटरप्राइजेसच्या प्रॉपर्टीवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे विजयनं त्याच्या सिनेमाचं शूटिंग थांबवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयनं या सिनेमासाठी AGS सिनेमाज कडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात घेतली होती.

VIDEO : ब्रेकअपबद्दल असं काय म्हणाला कार्तिक की, ऐकल्यावर सारालाही बसला धक्का

या संपूर्ण प्रकरणावर विजयनं त्याचं ऑफिशियल स्टेटमेंट दिलं आहे. ज्यात त्यानं आयकर विभागानं त्याच्या घरी आणि ऑफिसवर छापा टाकल्याचं मान्य केलं. या कारवाईमध्ये त्याचा स्टाफ आणि कुटुंबीयांनी आयकर विभागाला पूर्ण सहकार्य केल्याचं त्यानं म्हटलं आहे. तसेच टॅक्स रिटर्नचे सर्व कागदपत्र आपण आयकर विभागाला सादर केल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

सारा-कार्तिकनं रणवीर सिंहपासून लपवलं होतं 'हे' सत्य, आता झाला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2020 01:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading