बाॅक्स आॅफिसवर चार सिनेमांची ट्रीट!

बाॅक्स आॅफिसवर चार सिनेमांची ट्रीट!

आज पुन्हा चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात दोन हिंदी आणि दोन मराठी सिनेमांचा समावेश आहे.

  • Share this:

11 मे : आज पुन्हा चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात दोन हिंदी आणि दोन मराठी सिनेमांचा समावेश आहे. आज रिलीज झालेला पहिला हिंदी सिनेमा आहे राझी. या सिनेमात आलिया भट्ट आणि विकी कौशल हे मुख्य भूमिकेत आहेत. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा 'कॉलिंग सेहमत' या कादंबरीवर आधारित असून लग्न करून पाकिस्तानात गेलेल्या एका भारतीय जासूस असलेल्या मुलीची ही कथा आहे.

आज रिलीज झालेला दुसरा सिनेमा आहे होप और हम. या सिनेमात नसिरूद्दीन शहा आणि सोनाली कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र काम करतायत. सुदीप बंडोपाध्याय दिग्दर्शित या सिनेमातून एका कुटुंबाची गोष्ट आपल्याला पहायला मिळेल.

याशिवाय मराठीत आज रिलीज झालेला सिनेमा आहे रणांगण. स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं असून त्यातून शिक्षणमंत्री आणि सर्वसामान्य माणसातलं द्वंद्व आपल्याला पहायला मिळेल.

याशिवाय लग्न मुबारक हा सिनेमाही आज रिलीज झालाय. सिनेमेटोग्राफर आणि दिग्दर्शक संजय जाधव यांची मुख्य भूमिका असलेला असा हा सिनेमा आहे.

First published: May 11, 2018, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading