• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • जुन्या मालिकांची गच्छंती! Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येणार 4 नव्या मालिका

जुन्या मालिकांची गच्छंती! Zee पाठोपाठ Sony marathi आणि स्टार प्रवाहवर येणार 4 नव्या मालिका

झी मराठीने (Zee Marathi )ऑगस्ट महिन्यात नव्या मालिकेचा धुमधडाकाच लावला होता. एक नव्हे दोन नव्हे तर झी मराठीने तब्बल पाच नव्या मालिका सुरू केल्या होत्या. आता यामध्ये सोनी मराठी कशी काय मागे राहिल. सोनी मराठी (Sony Marathi) देखील आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनी मराठी देखील मनोरंजनाचा ट्रिपल डोस देणार आहे. कारण सोनी मराठी तीन नव्या मालिका (Sony Marathi New Serial ) घेऊन आपल्या भेटीला येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ; झी मराठीने  (Zee Marathi )ऑगस्ट महिन्यात नव्या मालिकेचा धुमधडाकाच लावला होता. एक नव्हे दोन नव्हे तर झी मराठीने तब्बल पाच नव्या मालिका सुरू केल्या होत्या. आता यामध्ये सोनी मराठी कशी काय मागे राहिल. सोनी मराठी (Sony Marathi) देखील आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनी मराठी देखील मनोरंजनाचा ट्रिपल डोस देणार आहे. कारण सोनी मराठी तीन नव्या मालिका (Sony Marathi New Serial )  घेऊन आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेचे प्रोमे देखील सोनी मराठीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या प्रमोजला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या नव्या मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठी अतूट नाती विणण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच स्टार प्रवाहवर देखी नवी मालिका येत आहे. या मालिका कोणत्या आहेत व त्याची नाव काय आहेत व कथानाक काय असणार असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर यापैकी एक मालिका संत परंपरेवर तर दुसरी डेलीसोप तर तिसरी रिअॅलिटी शो असणार आहे. यामुळे मनोरंजनाच्या रेसमध्ये सोनी मराठी पुढे जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. वाचा : Bigg Boss Marathi 3 : 'चिऊ ताई' च्या टास्कमध्ये नेमकं काय झालं? PHOTOS आले समोर  ‘ज्ञानेश्वर माउली’ सोनी मराठी वाहिनीवर ‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका 27 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडली जाणार आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. दिगपाल या मालिकेचं दिग्दर्शन देखील करणार आहेत. ज्ञानेश्वर माउलींच्या या चरित्रगाथेतून दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे. 'इंडियन आयडल मराठी' कर्लस मराठीवर नुकतात बिग बॉस मराठीचा तीसरा सीझनची रविवारपासून मोठ्या धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. आता कर्लस मराठीनंतर सोनी मराठी वाहिनी देखील एक रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. इंडियन आयडल मराठी (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम लवकरच सोनी मराठीवर (Sony liv app) प्रदर्शित होणार आहे. याच्या ऑडिशन्स 17 सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत. कुठे ही न जाता आता घरबसल्या या कार्यक्रमाची ऑडिशन देता येणार आहे. इंडियन आयडल मराठी कधी सुरू होणार याची तारीख मात्र अद्याप समोर आलेली नाही. वाचा : Khatron Ke Khiladi 11 Winner:  'या' टीव्ही अभिनेत्याने जिंकला यंदाचा 'खतरों के खिलाड़ी 11' चा किताब 'कुसुम' सोनी मराठीवर 4 ऑक्टोबरपासून 'कुसुम' ही मालिका देखील सुरू होणार आहे. याचा प्रमो देखील सोनी मराठीने प्रसिद्ध केला आहे. या मालिकेत 'लागिर झालं जी' या मालिकेतील सर्वांची लाडकी शीतली म्हणजे अभिनेत्री म्हणजे शिवानी बोरकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'कुसुम' मालिकेत एका सर्वसामान्य मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. जी आपलं सासर आणि माहेर या दोन्हीची जबाबदारी समर्थपणे पेलणार आहे. 'कुसुम' ही मालिका सोनी हिंदी वाहिनीवरील मालिका 'कुसुम' चा रिमेक असणार आहे. तर निर्माती एकता कपूर या मालिकेची निर्मिती करत आहे. या नव्या भूमिकेतून शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेईल यात दुमत नाही. सोनी मराठीवर या नव्या तीन मालिका सुरू होणार असल्या तरी कोणत्या जुन्या मालिका बंद होणार असा देखील प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. यासोबतच स्टार प्रवाह या वाहिनीवर देखील 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. एकूणच काय तर झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह या मराठी वाहिन्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत असेच काहीसे चित्र दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: