'3 इडियट्स'चे फुंसुक वांगडू केबीसीमध्ये, जिंकले 50 लाख

'3 इडियट्स'चे फुंसुक वांगडू केबीसीमध्ये, जिंकले 50 लाख

सोनम हे एक सृजनशील आणि सेवाभावी व्यक्ती आहेत. लडाखमध्ये ते एका अनोख्या पद्धतीची शाळा चालवतात. जी मुलं शिक्षणात कमजोर असतात पण त्यांचा आयक्यू तितकाच चांगला असतो अशा मुलांसाठी सोनमने एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

  • Share this:

15 आॅक्टोबर : अभिनेता आमिर खानचा सुपरहिट सिनेमा '3 इडियट्स' मधील आमिरची भूमिका तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. यात आमिर रणछोडदास छांछड उर्फ रँचो जो नंतर फुंसुक वांगडू बनून प्रेक्षकांच्या समोर आला. सिनेमातली ही आगळीवेगळी नावं मजेसाठी वापरण्यात आली होती, पण खरं तर ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित होती. हेच सोनम वांगचुक केबीसीमध्ये आले होते. आणि त्यांनी 50 लाख जिंकले.

सोनम हे एक सृजनशील आणि सेवाभावी व्यक्ती आहेत. लडाखमध्ये ते एका अनोख्या पद्धतीची शाळा चालवतात. जी मुलं शिक्षणात कमजोर असतात पण त्यांचा आयक्यू तितकाच चांगला असतो अशा मुलांसाठी सोनमने एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

अलिकडे सोनम वांगचूक, अमिताभ बच्चन यांच्या केबेसीच्या हॉट सीटवर बसला. प्रश्नांची अचूक उत्तर देत त्यांने पाच लाख रुपये जिंकले.  या जिंकलेल्या धनादेशातुन सोनमला आपल्या लडाखमधल्या शाळेच्या शिक्षणासाठी खर्च करायचा आहे.

लडाखमध्ये एक विश्वविद्यालय बांधण्याचं स्वप्न बाळगणारे सोनम हा पेशाने इंजीनियर आहेत. आपला मित्र सेवांगच्या मदतीने सोनम केबीसीचा स्पेशल गेस्ट म्हणून हॉटसिटपर्यंत पोहचले. शो दरम्यान सोमनने अमिताभ बच्चनचे डायलॉग्स लडाखी, फ्रेंच आणि पंजाबी भाषेत बोलून सगळ्यांचच मनोरंजन केलं. एवढंच काय तर अमिताभ बच्चनच्या वडिलांची हरिवंश राय बच्चन यांची 'पूर्ब चलने के बटोही' ही कविता ऐकवून दाखवली. या कवितेने अमिताभ बच्चन खूपच भावुक झाले.

या एपिसोडमध्ये सोनमची लडाखमधली शाळाही दाखवली आहे. त्या शाळेतल्या मुली आइस हॉकी हा गेम खेळताना दिसतायत. यात सोनमने सांगितलं की त्यांची संपूर्ण शाळा सौर उर्जेवर चालते आणि हे सगळी सिस्टम चालवण्याचं काम शाळेतली मुलंच करतात. त्याच्या शाळेतील महिलांची हॉकी टीम तायपे आणि बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी भारताचं नेतृत्व करते. या गोष्टीने फक्त काश्मिरसाठीच नाहीतर अवघ्या भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे.

सोनम वांगचूकच्या जगण्यापासून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण इतरांना मदत केली पाहिजे.

First published: October 15, 2017, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading