• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मराठी मालिकेचं शूटिंग ठरलं धोकादायक; 27 जणांना संसर्ग, अभिनेत्री गंभीर

मराठी मालिकेचं शूटिंग ठरलं धोकादायक; 27 जणांना संसर्ग, अभिनेत्री गंभीर

चित्रीकरणाची परवानगी दिल्यानंतर अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : कोरोनाच्या कहरामुळे राज्यातील सर्व महत्त्वाच्या सेवांसह चित्रपट व मालिकांचं चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. काही आठवड्यांपूर्वी पुन्हा चित्रीकरण सुरू झालं आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी मालिकेतील मुख्य भूमिकेतील अभिनेत्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होता. त्याच्यानंतर मराठी मालिका क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. त्यादरम्यान येथील तब्बल 27 जणांना कोरोनानं ग्रासलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण सुरू केल्यानंतरही ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकरांची भूमिका आहे. त्यांना यादरम्यान कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या आशालता यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे ही वाचा-ABCD फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक, ड्रग सप्लाय केल्याचा आरोप मिळालेल्या माहितीनुसार येथे मुंबईतील एक डान्स ग्रुप चित्रीकरणासाठी गेला होता. तेव्हा कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील लोणन या गावी हे चित्रीकरण सुरू होतं. सुरुवातील येथील गावकऱ्यांनी चित्रीकरणासाठी नकार दिला होता. आता नृत्यांचं चित्रीकरण मुंबईतील स्टुडीओमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे.  राज्य सरकारने कोरोनामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असली तरी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले आहे. शूटिंगदरम्यान तेथील सेट वारंवार सॅनिटाइझ करण्याबरोबर कलाकारांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. गेल्या काही महिन्यात अनेक कलाकारांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बिग बी अभिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी अराध्या यांनी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते कोरोनाचा लढा जिंकून घरी परतले आहे. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: