मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /2021 मध्ये मिळणार मनोरंजनाचा डोस; कोणते 22 चित्रपट प्रदर्शित होणार वाचा क्लिकवर

2021 मध्ये मिळणार मनोरंजनाचा डोस; कोणते 22 चित्रपट प्रदर्शित होणार वाचा क्लिकवर

 2021 मध्ये या वर्षात अनेक चित्रपट तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या विविध विषयांवरील 22 चित्रपटांमुळे चित्रपटरसिकांना जणू मेजवानीच मिळणार आहे. चला तर बघूया कोणते आहेत हे चित्रपट.

2021 मध्ये या वर्षात अनेक चित्रपट तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या विविध विषयांवरील 22 चित्रपटांमुळे चित्रपटरसिकांना जणू मेजवानीच मिळणार आहे. चला तर बघूया कोणते आहेत हे चित्रपट.

2021 मध्ये या वर्षात अनेक चित्रपट तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या विविध विषयांवरील 22 चित्रपटांमुळे चित्रपटरसिकांना जणू मेजवानीच मिळणार आहे. चला तर बघूया कोणते आहेत हे चित्रपट.

मुंबई, 02 जानेवारी: कोरोनामुळे घरात अडकून पडलेल्या भारतीयांसाठी 2020 मनोरंजनाची महत्त्वाची साधनं होती टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि युट्यूब. पण आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. कोरोना लशींच्या चाचण्या पूर्ण होऊन त्यांना मान्यता मिळत आहे त्यामुळे सगळेच व्यवहार पूर्ववत होतील अशी आशा निर्माण झाली आहे. या नव्या आशेचा परिणाम आपल्याला मनोरंजनविश्वावरही पहायला मिळतोय. या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या विविध विषयांवरील 22 चित्रपटांमुळे चित्रपटरसिकांना जणू मेजवानीच मिळणार आहे. चला तर बघूया कोणते आहेत हे चित्रपट.

1) 83

दिग्दर्शक: कबीर खान

प्रॉडक्शन हाउस: रिलायन्स एंटरटेनमेंट, फँटम फिल्म्स, के. ए. प्रॉडक्शन्स, विब्री मीडिया, कबीर खान फिल्म्स, नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट

कलाकार: रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, चिराग पाटील, अम्मी विर्क, धैर्य करवा, ताहीर राज भसीन, हार्डी संधू, आर बद्री, जतिन सरना, जिवा, साकिब सलीम, दिनकर शर्मा, निशांत शर्मा, निशांत दहिया.

थोडक्यात कथा : भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा 1983 साली वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता त्यावर आधारित 83 चित्रपटाचं कथानक आहे. भारतीय संघाचा कर्णधार ज्येष्ठ वेगवान गोलंदाज कपिल देव यांची भूमिका आघाडीचा अभिनेता रणवीरसिंहने साकारली आहे. आणखी एक विशेष म्हणजे मराठीतील अभिनेता आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारेंचा मुलगा आदिनाथ कोठारे या चित्रपटात दिसणार आहे. त्याने दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारली आहे. प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित असलेला हा बहुतेक सर्वांत मोठा चित्रपट आहे. गेल्यावर्षीचा हा चित्रपट रिलीज होणार होता पण कोरोना महामारीमुळे या वर्षी तो रिलीज होईल त्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही.

2) राधे

दिग्दर्शक: प्रभुदेवा

प्रॉडक्शन हाउस: रील लाइफ एंटरटेनमेंट आणि सलमान खान फिल्म्स.

कलाकार: सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हुड्डा.

थोडक्यात कथा  : देशात सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. सलमानच्या वाँटेड चित्रपटातील भूमिकेचं नाव होतं राधे आणि त्याच नावाने त्याचा नवा चित्रपट येत आहे. दिशा पटानीसोबतची त्याची केमिस्ट्री पहायला सगळेच आतुर झाले आहेत. हा चित्रपट 2020 तील ईदला रिलिज होणार होता तो कोरोनामुळे पुढ ढकलला गेला आता यो ईद 2021ला रिलिज होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

3) के.जी.एफ. 2

दिग्दर्शक: प्रशांत नील

प्रॉडक्शन हाउस: एक्सेल एंटरटेनमेंट, हॉम्बेल स्टूडियो

कलाकार: यश, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी

थोडक्यात कथा : बाहुबली 2 नंतर देशभरातील चाहत्यांनी सर्वाधिक वाट पाहिलेला चित्रपट कुठला असेल तर यशच्या अभिनयाने सजलेला केजीएफ 2. केजीएफ हा मूळचा कन्नड चित्रपट आहे. दुसऱ्या भागात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारतोय त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

4) तूफान

दिग्दर्शक: राकेश ओमप्रकाश मेहरा

प्रॉडक्शन हाउस: एक्सेल एंटरटेनमेंट और रोम्प

कलाकार: फरहान अख्तर, मृणाल ठाकूर, परेश रावल

थोडक्यात कथा : गली बॉय, केजीएफ 1 आणि मिर्झापूर 2 वेबसीरिजच्या यशानंतर एक्सेल एंटरटेनमेंटनी एक नवा सिनेमा प्रेक्षकांसाठी आणला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी बॉक्सरची भूमिका फरहान अख्तरनी साकारली आहे. या आधी मेहरांच्या भाग मिल्खा भाग या स्पोर्ट्स ड्रामा फिल्ममध्ये फरहाननी काम केलं होतं. या भूमिकेसाठी फरहाननी शरीर कसदार करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत.

5) राधेश्याम

दिग्दर्शक: राधा कृष्ण कुमार

प्रॉडक्शन हाउस: यूवी क्रिएशन्स,  टी सीरीज

कलाकार: प्रभास, पूजा हेगड़े

थोडक्यात कथा : राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या राधेश्याम चित्रपटात राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची रोमँटिक कथा चित्रित करण्यात आली असून देशभर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रभास व पूजा हेगडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या असून देवदास-पार्वती, रोमियो-जूलियट, सलीम-अनारकली या प्रेमकहाण्यांप्रमाणेच ही एक प्रेमकहाणी आहे.

6) लाल सिंह चड्डा

दिग्दर्शक: अद्वैत चंदन

प्रॉडक्शन हाउस: आमीर खान प्रॉडक्शन्स, वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स

कलाकार: आमीर खान, करिना कपूर, विजय सेठी, मोना सिंह

थोडक्यात कथा : लाल सिंह चड्डा चित्रपटात आमीर खान एका शीख सरदाराच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट हॉलीवूडमधील फॉरेस्ट गम्पचा अधिकृत रिमेक आहे. दंगलनंतर अमीर खानच्या प्रॉडक्शनची ही दुसरी फिल्म आहे.

7) आर. आर. आर.

दिग्दर्शक: एसएस राजामौली

प्रॉडक्शन हाउस: डीवीवी एंटरटेनमेंट्स

कलाकार: जुनियर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस, अजय देवगण

थोडक्यात कथा : स्वातंत्र्यसैनिक सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांची कहाणी एस.एस. राजमौलींच्या या नव्या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आपल्याला आदर असून त्यांचं बलिदान चित्रपटातून मांडण्याचा मी कायम प्रयत्न केला आहे असं राजमौलींनी मुलाखतींत सांगितलं आहे.

8) बॉब बिस्वास

दिग्दर्शक: दिया अन्नपूर्णा घोष

प्रॉडक्शन हाउस: रेड चिलीज़ एंटरटेनमेंट, बाउंड स्क्रिप्ट प्रॉडक्शन

कलाकार: अभिषेक बच्चन, चित्रांगदा सिंह

थोडक्यात कथा : सुजॉय घोषने 2012 मध्ये दिग्दर्शित केलेल्या कहानी या थ्रिलर चित्रपटाचा स्पिन-ऑफ म्हणजे  बॉब विश्वास हा चित्रपट आहे. कहानी चित्रपटातील बॉब विश्वास हा इन्शुरन्स कंपनीत काम करत असतानाच कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणूनही काम करत असतो. ही भूमिका नव्या चित्रपटात अभिषेक बच्चन साकारणार असून त्याने भूमिकेसाठी खूप कष्ट घेतले आहेत.

9) रश्मी रॉकेट

दिग्दर्शक: आकाश खुराना

प्रॉडक्शन हाउस: आरएसवीपी फिल्म्स

कलाकार: तापसी पन्नू, प्रियांशु पेन्युली, अभिषेक बनर्जी

थोडक्यात कथा : रश्मि रॉकेटमध्ये तापसी पन्नू एका धावपटूची भूमिका साकारते आहे. आरएसव्हीपी फिल्म्सने चित्रपटाची निर्मिती केली असून आकाश खुराना दिग्दर्शन करत आहे. त्याने या आधी इरफान खानच्या कारवाँ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तापसीने जवळजवळ एक वर्ष या चित्रपटासाठी प्रशिक्षण घेतलं आहे.

10) अनटाइटल्ड

दिग्दर्शक: लव रंजन

प्रॉडक्शन हाउस: लव फिल्म्स

कलाकार: रणबीर कपूर, श्रद्धा कपूर

थोडक्यात कथा : लव रंजन रोमँटिक कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या दिग्दर्शनात रणबीर कपूर काम करणार असल्याने लोकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नसलं तरीही रणबीरबरोबर श्रद्धा कपूर या चित्रपटात दिसेल.

11) बच्चन पांडे

दिग्दर्शक: फरहाद सामजी

प्रॉडक्शन हाउस: नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट

कलाकार: अक्षय कुमार, कृती सेनन

थोडक्यात कथा : साजिद नाडियाडवाला, अक्षय कुमार आणि फरहाद सामजी हे सुपरहिट फिल्म हाउसफुल 4 नंतर पुन्हा एकत्र येतील. फिल्मचा पहिला लुक आधीच प्रसिद्ध झाला आहे ज्यात अक्षय कुमार एका वेगळ्याच वेशभूषेत दिसतो आहे. त्याचा उजवा डोळा अर्धवट मिटलेला आहे. चेहऱ्यावर तलवारीच्या वाराच्या खुणा आहेत. यामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होते आहे.

12) फोन भूत

दिग्दर्शक: गुरमितसिंग

प्रॉडक्शन हाउस: एक्सेल एंटरटेनमेंट

कलाकार: कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर

थोडक्यात कथा : एक्सेल एंटरटेनमेंटच्या नव्या चित्रपटात कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर दिसणार आहेत. फिल्म मिर्झापूरचा दिग्दर्शक गुरमितसिंगने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.  फिल्मचं शूटिंग सुरू झालं असून तो 2021 मध्येच रिलिज होण्याची शक्यता आहे.

13 ) बधाई दो

दिग्दर्शक: हर्षवर्धन कुलकर्णी

प्रॉडक्शन हाउस: जंगल पिक्चर्स

कलाकार: राजकुमार राव, भूमी पेडणेकर

थोडक्यात कथा : बधाई हो या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे बधाई दो हा चित्रपट. हा पण एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. यात राजकुमार राव एका महिला पोलीस स्टेशनमधला शिपाई आहे आणि भूमी पीटी टीचर आहे.

14) अंतिम

दिग्दर्शक: महेश मांजरेकर

प्रॉडक्शन हाउस: सलमान खान फिल्म्स

कलाकार: सलमान खान, आयुष शर्मा

थोडक्यात कथा : मराठीत सुपरहिट झालेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा हिंदीतील रिमेक म्हणजे अंतिम. यात सलमान खान शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून आयुष शर्मा गुंडाची भूमिका साकारेल. मराठी आणि हिंदीत हिट चित्रपट देणारे अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. महेश मांजरेकरांनी मुळशी पॅटर्न सिनेमात भूमिका केली होती.

15) लव हॉस्टेल

दिग्दर्शक: शंकर रमन

प्रॉडक्शन हाउस: रेड चिलीज़ एंटरटेनमेंट, दृश्यम फिल्म्स

कलाकार: बॉबी देओल, विक्रांत मैसी, सान्या मल्होत्रा

थोडक्यात कथा  : ही रेड चिलीज एंटरटेनमेंट व दृश्यम फिल्म्सची निर्मिती आहे. गेल्यावर्षाच्या सुरुवातीला रिलिज झालेल्या कामयाब या चित्रपटानंतर हे दोन निर्माते पुन्हा एकत्र आले आहेत. तगड्या स्टारकास्टमुळे चित्रपट चालण्याची आशा आहे.

16) बागी 4

दिग्दर्शक: अहमद खान

प्रॉडक्शन हाउस: नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट

कलाकार: टायगर श्रॉफ

थोडक्यात कथा : अक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या बागी चित्रपटाच्या चौथ्या भागात आपण टाइगर श्रॉफला पाहू शकणार आहोत. अहमद खान त्याचं दिग्दर्शन करत आहे. या आधीच्या तिन्ही चित्रपटांनी जोरदार कमाई करत विक्रम नोंदवले आहेत.

17) तड़प

दिग्दर्शक: मिलन लुथरिया

प्रॉडक्शन हाउस: नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट

कलाकार: अहान शेट्टी और तारा सुतारिया

थोडक्यात कथा : तड़पमधून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी पदार्पण करतोय. तेलुगु सुपरहिट आरएक्स 100 चा हा रिमेक आहे. हिरोपंतीतून टायगरला लाँच केल्यानंतर साजिद नाडियादवाला आता नव्या हिरोला लाँच करत आहेत.

18) कभी ईद, कभी दीवाली

दिग्दर्शक: साजिद समजी

प्रॉडक्शन हाउस: नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट, सलमान खान फिल्म्स

कलाकार: सलमान खान

थोडक्यात कथा  : सलमान खान व साजिद नाडियाडवाला यांनी जुड़वा, मुझसे शादी करोगी व किक हे हिट चित्रपट दिले आहेत. ते दोघं पुन्हा एकत्र आले असून, वर्षातील सर्वांत बिग हिट चित्रपट असू शकेल अशी निर्मात्यांची धारणा आहे.

19) अनेक

दिग्दर्शक: अनुभव सिन्हा

प्रॉडक्शन हाउस: बनारस मीडिया वर्क्स

कलाकार: आयुष्मान खुराना

थोडक्यात कथा  :  आयुष्मान खुराना आर्टिकल 15 नंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत या सिनेमात काम करणार आहे. या आधी अनुभव सिन्हाची थप्पड ही फिल्म आली होती आणि ती गाजलीही होती.

20) हीरोपंती 2

दिग्दर्शक: अहमद खान

प्रॉडक्शन हाउस: नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट

कलाकार: टाइगर श्रॉफ

थोडक्यात कथा  : हीरोपंती 2 हा टायगरच्या पहिल्या हिरोपंती चित्रपचाचा सिक्वेल आहे. हिरोपंतीतून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या टायगरने आता जम बसवला आहे. त्याच्याचसाठी निर्माता साजिद आणि दिग्दर्शक अहमद खान एकत्र आले आहेत.

 21) धमाका

दिग्दर्शक: राम माधवानी

प्रॉडक्शन हाउस: आरएसवीपी

कलाकार: कार्तिक आर्यन

थोडक्यात कथा : नीरजा आणि आर्या वेबसीरिजच्या यशानंतर दिग्दर्शक-निर्माता राम माधवानी कार्तिक आर्यनसोबत नवा चित्रपट घेऊन येत आहेत त्याचं नाव आहे धमाका. नीरजा हा चित्रपट खूप गाजला होता.

22) तेजस

दिग्दर्शक: सर्वेश मेवाड़ा

प्रॉडक्शन: रॉनी स्क्रूवाला

कलाकार: कंगना रनौत

थोडक्यात कथा  : या चित्रपटाचं शूट डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. तेजस चित्रपटात कंगना रनौत एका लढवय्या पायलटची भूमिका साकारत आहे. भारतीय वायू दलाने 2016 मध्ये महिलांना लढाऊ जबाबदारी द्यायला सुरूवात केली. असं करणारी ही जगातील पहिली वायूसेना आहे. या घटनेतून प्रेरित होऊन तेजस चित्रपट बनवला आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News