400 कोटींच्या '2.0'चा टीझर पाहिलात का?

गणेश चतुर्थीनिमित्त अक्षय कुमारनं आपल्या फॅन्सना खास भेट दिलीय. बहुचर्चित '2.0'चा टीझर रिलीज झालाय. त्याला हिट्सही बऱ्याच मिळाल्या.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2018 03:28 PM IST

400 कोटींच्या '2.0'चा टीझर पाहिलात का?

मुंबई, 13 सप्टेंबर : गणेश चतुर्थीनिमित्त अक्षय कुमारनं आपल्या फॅन्सना खास भेट दिलीय. बहुचर्चित '2.0'चा टीझर रिलीज झालाय. त्याला हिट्सही बऱ्याच मिळाल्या. या टीझरमधून सिनेमाची व्हिज्युअल्स समोर आलीयत. अक्षयनं अगोदर ट्विट करून हा टीझर कधी येणार ते सांगितलं होतं.

अक्षय आणि रजनीकांतचा हा '2.0' सिनेमा रोबोटचा सिक्वल आहे. रजनीकांत यात डबल रोलमध्ये आहे, तर अक्षय खलनायक आहे. 400 कोटींचा बनलेला हा सिनेमा भारतातला सर्वात महागडा सिनेमा आहे.

बाॅलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित रोबोट 2.0 सिनेमाचं मेकिंगचा व्हिडिओ  प्रसिद्ध करण्यात आला होता. या मेकिंग व्हिडिओमध्ये अक्षय आणि रजनीकांत यांचा मेकअप कसा करण्यात आला हे दाखवण्यात आलंय. तसंच स्पेशल इफेक्ट्स  स्टंट्स कसे शूट करण्यात आले हेही तुम्हाला या व्हिडिओत पाहण्यास मिळालं.

एवढंच नाहीतर या सिनेमाचे स्पेशल इफेक्टही धडाकेबाज आहे. या सिनेमाचं जगभरात प्रमोशन सुरू आहे.

Loading...

काही दिवसांपूर्वी रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0' सिनेमातल्या एमी जॅक्सनचा लूक रिलीज झाला होता. . या पोस्टरमध्ये एमी रोबोटच्या लूकमध्ये दिसते. हा सिनेमा रजनीकांच्या 'रोबोट'चा रिमेक आहे.

एमीनं आपला लूक ट्विटरवर शेअर करत लिहिलं होतं, मी या सिनेमाचं शूट सुरू केलं, तेव्हापासून हा लूक शेअर करायची वाट पाहत होते. या सिनेमात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत आहे.

अक्षय कुमारला आपण अनेक रूपात पाहिले. रुस्तम, एअरलिफ्ट, पॅडमॅन, टाॅयलेट एक प्रेमकथा असे अनेक सिनेमे हटके होते आणि ते हिटही झाले. अलिकडे रिलीज झालेला गोल्ड सिनेमाही 100 कोटींच्या घरात गेलाय. त्यामुळे दोन सुपरस्टार्स असलेल्या या '2.0' सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.

दगडूशेठ हलवाई गणपतीचा नयनरम्य देखावा ड्रोनमधून पहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...