शाहिदच्या पत्नीनं कोणाला म्हटलं My Love? दिल्या Valentine Day च्या शुभेच्छा!

शाहिदच्या पत्नीनं कोणाला म्हटलं My Love? दिल्या Valentine Day च्या शुभेच्छा!

शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिनं पतीऐवजी दुसऱ्याच कोणा व्यक्तीला माय लव्ह म्हणत व्हेलंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना म्हटला की सर्वांनाच वेध लागतं ते व्हेलेंटाईन डेचं. (Valentines Day) १४ फेब्रुवारी अर्थात व्हेलंटाईन डे हा दिवस संपूर्ण जगात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्तानं देशभरातील सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना व्हेलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु या सर्वांमध्ये अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिनं पतीऐवजी दुसऱ्याच कोणा व्यक्तीला माय लव्ह म्हणत व्हेलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.

मीरानं इन्स्टाग्रामवर दोन थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मीरासोबत तिची बालपणीची मैत्रीण सेजल कुकरेजा दिसत आहे. तिने मीराला मिठी मारत तिच्या गालावर किस केलं आहे. तर दुसऱ्या ती आपल्या मैत्रीणीला आनंदानं मिठी मारताना दिसत आहे. “सेजल माझी जिवलग मैत्रीण आहे. जेव्हा कधी मी कुठल्याही संकटात असते तेव्हा मी तिला फोन करते. माझ्या खास मैत्रीणीला व्हॅलेंनटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा.” अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोंवर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा - मित्रासाठी कायपण! सलमान-शाहरुख एकत्र झळकणार; एकाने तर चित्रपट टाकला लांबणीवर

मीरा ही अभिनेता शाहिद कपूरची पत्नी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. ती सिनेसृष्टीत कार्यरत नाही. तरी देखील आपल्या स्टाईलिश अंदाजामुळं ती सोशल मीडियावर चर्चेत असते. फॉलोअर्सच्या बाबतीत ती कुठल्याही सुपरस्टार अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Published by: Mandar Gurav
First published: February 14, 2021, 5:57 PM IST

ताज्या बातम्या