मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /108 MP कॅमेरा, 8GB RAM सह स्वस्तात मिळतोय Xiaomi चा हा स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

108 MP कॅमेरा, 8GB RAM सह स्वस्तात मिळतोय Xiaomi चा हा स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

  नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : शाओमीच्या (Xiaomi) ऑफिशियल वेबसाइटवर सुरू असलेल्या एक्सचेंज डे सेलचा (Exchange Day) आज (3 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. या सेलमध्ये ग्राहक त्यांचा जुना फोन एक्सचेंज केल्यानंतर नवीन फोन खरेदीवर मोठी सूट मिळवू शकतात. अशाच काही बेस्ट डील सध्या Xiaomi च्या वेबसाइटवर आहेत. या वेबसाइटवर Mi 10 i हा फोन ग्राहक चांगल्या ऑफरमध्ये घेऊ शकतात.

  Mi.com वर दिलेल्या माहितीनुसार, Mi 10 i फोन 20,499 रुपयांना उपलब्ध आहे. त्याशिवाय या फोनवर 3,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जात आहे. SBI कार्डचा उपयोग करून हा फोन खरेदी केल्यावर 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय ग्राहक या फोनसोबतच Mi Wifi स्मार्ट स्पीकर फक्त 1,999 रुपयांना खरेदी करू शकतात.

  Mi 10 i हा फोन 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB या तीन स्टोरेज वेरियंटमध्ये येतो. बजेटमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8GB पर्यंत रॅम या फोनमध्ये देण्यात येत आहे. Pacific Sunrise, Atlantic Blue, आणि Midnight Black या तीन रंगात Mi 10i उपलब्ध आहेत.

  VIDEO:एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone,पुढे नेमकं काय झालं..

  Mi 10 i स्पेसिफिकेशन -

  - 6.67 इंच फुल HD + (2400 x 1080 पिक्सल) रिझोल्युशन डॉट डिस्प्ले

  - 120Hz ॲडेप्टिव सिंक रिफ्रेश रेट

  - कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5

  - अँड्रॉइड बेस्ट MIUI 12

  - फिंगरप्रिंट सेन्सर

  - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर

  - X52 5G मॉडेम

  - 4820 mAh बॅटरी

  - 33 W फास्ट चार्जर

  Mi 10i को ऑफर के साथ खरीदा जा सकता है.

  पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

  108 मेगापिक्सल कॅमेरा -

  Mi 10i फोनला चार रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. 108 मेगापिक्सल प्राइमरी(Samsung HM2) सेंसर, अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  First published:

  Tags: Tech news, Xiaomi