जगातील सर्वाच उंच पर्वत माउंट एव्हरेस्टवर तब्बल 25 वेळा चढण्याचा विक्रम केलेल्या शेरपा यांनी देवाच्या आज्ञेवरून 26 व्या वेळेची योजना रद्द केली आहे. पाहा नक्की काय आज्ञा दिली होती देवाने.
पर्वतावरून हेलिकॉप्टरने मंगळवारी काठमांडूला जाऊन त्यांनी सांगितले की, "मी 26 व्या वेळेस गिर्यारोहणासाठी निघालो होतो. तिसऱ्या टप्प्यात पोहोचलो होतो. पण अचानक वातावरण बिघडलं आणि मला अतिशय वाईट स्वप्न पडलं त्यामुळे मी मागे फिरलो."
रिता शेरपा हे पर्वाताला देवाप्रमाणे मानतात. गिर्यारोहणाआधी ते पाठपुजा करतात. आता 26 वा प्रयत्न ते पुढील वर्षी करणार आहेत.
गिर्यारोहक शेरपा कामी रिता हे 51 वर्षांचे आहेत. 1994 साली त्यांनी हा पर्वत चढणायचा पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर ते तब्बल 25 वेळा हा पर्वत चढले आहेत. ते जगातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी हा विक्रम केला आहे.
27 वर्षांत शेरपा कामी रिता यांनी 25 वेळा माउंट एवरेस्ट सर केला आहे. शेरपा कामी रिता यांचे वडील आधी गाईड होते, त्यानंतर शेरपा कामी रिता यांनी हे काम सुरू केलं. शेरपा कामी रिता यांनी माउंट एवरेस्ट शिवाय K-2, Cho-Oyu, Manaslu and Lhotse या उंच ठिकाणांवर जाण्याचाही विक्रम केला आहे.