मारुती कंपनीची वॅगनार कार (wagonr car) देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या सीएनजी कारपैकी एक आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, 7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची ही कार एक किलोग्रॅम गॅसमध्ये 32 किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करू शकते. त्यानुसार, या कारने दिल्ली ते जयपूरचा प्रवास 450 रुपयांपेक्षा कमी किमतीत करता येईल.
ह्युंदाई मोटर्सची ऑरा सेडान सर्वोत्कृष्ट सीएनजी कार आहे. या कारमध्ये कंपनी 1.2 लिटरचे bi-fuel इंजिन देते. हे इंजिन पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हींवर कार्य करते. या कारबद्दल कंपनीने दावा केला आहे की, ही कार 28 किमीचे मायलेज देते. या कारची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 7 लाख 45 हजार रुपये एवढी आहे.
- मारुतीच्या अल्टो कारला देशातील मध्यवर्गीयांची नेहमीच पसंती राहिली आहे. मारुतीची अल्टो कार कंपनीकडूनच फॅक्ट्री फिट सीएनजी मॉडेलमध्ये येते. अल्टो कारबद्दल कंपनीने असा दावा केला आहे की, ही कार एक किलोग्रॅम सीएनजीमध्ये 31 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर जाऊ शकते. अशा प्रकारे छोट्या-मोठ्या फॅमिली ट्रिपसाठी ही आपली पहिली पसंत असू शकते. या कारची दिल्लीमधील एक्स-शोरूम किंमत 4 लाख 48 हजार रुपये एवढी आहे.
ह्युंदाईची सर्वात जास्त पसंती मिळालेली हॅचबॅक कार सँट्रोचं सीएनजी मॉडेल एका किलोग्रॅम गॅसमध्ये 30 किलोमीटरहून अधिक मायलेज देते. आपल्या किंमतीच्या जोरावर या श्रेणीमध्ये ही कार मारुतीच्या वॅगनार आणि अल्टोला टक्कर देते. या कारची दिल्लीमधील एक्स शोरुम किंमत 5 लाख 48 हजार एवढी आहे.