झी गौरव २०१९ पुरस्काराची नामांकनं दिमाखदार सोहोळ्यात पार पडली.
या सोहळ्याचं सूत्रसंचालन झी परिवारातून पदार्पण केलेल्या अभिजित खांडकेकर आणि अनिता दाते यांनी केलं.
तसंच यंदा नामांकन सोहोळ्याची थिम होती, OverTheTop (To Be in Spotlight)
यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सुबोध भावे ( आणि काशिनाथ घाणेकर ), स्वानंद किरकिरे (चुंबक ), ओम भूतकर ( मूळशी पॅटर्न ) आणि आदिनाथ कोठारे ( पाणी ) यांना नामांकनं मिळालीयत.
तर अभिनेत्री म्हणून कल्याणी मुळ्ये ( न्यूड ), प्रिया बापट ( आम्ही दोघी ) सोनाली कुलकर्णी ( गुलाबजाम ) आणि इरावती हर्षे ( आपला मानूस ) यांना नामांकनं मिळालीयत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नाळ, पाणी, आणि काशिनाथ घाणेकर यांच्यात स्पर्धा आहे.