पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे.
भारताच्या हल्ल्यानंतर बालाकोटची सीमा पाकिस्तानानं सील केली. या ठिकाणी पाकिस्तानी सेनेनं वेढा घातलाय. एका स्थानिकानं दिलेल्या माहितीनुसार तिथे 10 अँब्युलन्स पाहिल्या गेल्या.
बालाकोटमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. मुजफ्फरबादहून 40 किमीवर हे ठिकाण आहे.
भारतानं हल्ला केल्यानंतरही पाकिस्तान स्वत:ची बाजू सावरून घेतोय. पाकिस्तान म्हणतोय, आमचं काही नुकसान झालं नाही. उलट आमच्या वायुसेनेमुळे विमानांना परत जावं लागलं.
पाकिस्तानातले काही फोटोज बाहेर आलेत. त्यात तिथल्या मलब्याचा फोटो दिसतोय. त्यामुळे लोक घाबरलेत.
पाकिस्तानानं घाबरून सीमेवर कारवाया सुरू केल्यात. त्यांनी सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवल्यात.