अंतराळावर जाणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न विचारल्यावर लगेचंच उत्तर येतं ते म्हणजे राकेश शर्मा. आता यांची जीवनकथा मोठ्या पडद्यावर आपल्याला पहायला मिळणार आहे. सिनेमाच्या कास्टिंगपासून ते कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राकेश शर्मा यांची भूमिका अामिर खान साकारणार आहे असं म्हटलं जातंय.
मीडिया रिपोर्टनुसार राकेश शर्माची भूमिका आमिर खान करणार असल्याची चर्चा होती, मात्र आता बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान ही भूमिका करणार आहे.
चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राची निवड करण्यात आली होती. पण आता मराठमोळी भूमी पेडणेकर नायिकेची भूमिका करणार आहे.
चित्रपटाचे सहनिर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार आमिर खानच्या जागी शाहरूख खान असणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ रॉय कपूर या सिनेमाची निर्मिती करणार असून सिनेमाचं दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत.
एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, चित्रपटाच्या कास्टिंगबाबत खूप दिवसांपासून चर्चा चालू होती. मात्र आता शाहरूखच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्याचबरोबर 2019मध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू करणार असून ‘सारे जहांसे अच्छा’ असं या सिनेमाचं नाव असणार आहे.