काॅफी विथ करणचा सहावा सीझन बराच चर्चेत आहे. या शोमध्ये करण अनेक स्टार्सची सीक्रेट्स समोर आणतो. करण सगळ्यांचाच मित्र असल्यानं त्याच्या जवळ सगळे जण मनमोकळं बोलतात. शोमध्ये रंगत आणायला करण जोड्यांना बोलावतो.
अक्षय कुमार आणि रणवीर यांनी एकत्र येऊन शोमध्ये खूपच धमाल केली. यावेळी रणवीरनं एका रहस्याचा उलगडा केला. रणवीर एवढे फनी कपडे का घालतो, याचं उत्तर त्यानं दिलं.
रणवीर म्हणाला करणनं नाकारलेले कपडे तो घालतो. त्यामुळे त्याचं फंकी लूक लोकप्रिय झालंय.
रणवीर-दीपिकाचं लग्न 14 आणि 15 नोव्हेंबरला आहे. लग्नाचं ठिकाण इटली होतं. पण आता ते बदललं, अशीही चर्चा आहे.
गेली सहा वर्ष रणवीर-दीपिका रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे या शोमध्ये रणवीरनं अनेक गुपितंही शेअर केलीयत.