बधाई हो’ सिनेमाचं प्रोमोशन आठवडाभर सुरू आहे. बऱ्याच काळानंतर स्क्रिनवर झळकणारी नीना गुप्ताने चित्रपटात छान काम केलं आहे. बॉलिवूडला विसर पडलेल्या निनाने आपली कामगिरी या चित्रपटातून दाखवून दिली आहे. 59 वर्षाच्या नीना गुप्ताने या सिनेमात वयस्कर गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे, गरोदर महिलेची भूमिका साकारणारी नीना खासगी आयुष्यात सिंगल मदर आहे,
सिने जगतात आलेली अभिनेत्री नीना गुप्ता हिने सुरूवातीला चांगले सिनेमे केले. यानंतर श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातसुद्धा तिला संधी मिळाली. कामात प्रोफेशनल असणारी नीना खासगी आयुष्यात याच काळात रिलेशनमध्ये जोडली गेली.
80च्या दशकातील ही गोष्ट आहे. जेव्हा नीना गुप्ता आणि विवियन रिचार्ड्स रिलेशनमध्ये होते. विवियन रिचार्ड्स हा वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आहे. निना गुप्तानं रिलेशनची बातमी त्यावेळेस कोणाला कळू दिली नाही. नीना गुप्ताला बाळासोबत पाहिल्यावर ती रिलेशनमध्ये असल्याची बातमी सगळीकडे पसरली.
नीना गुप्ता लग्नाशिवाय आई झाल्याची बातमी इतकी पसरली की, तिच्यावर फार टिका करण्यात आली. पण नीनाने समाजात सिंगल मदर म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या प्रचंड टिकेनंतर देखील नीनाने खंभीरपणे उभी राहून परिस्थितीला तोंड दिलं.
वयाच्या 59 वर्षी गरोदर बाईची भूमिका स्वीकारणाऱ्या धाडसी नीना गुप्ताने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, सिंगल मदर राहण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. एकट्या बाईने मुलीचे पालनपोषण करणं खूप कठीण आहे. हा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता, पण मी येणाऱ्या संकाटाना बिनधास्त सामोरं गेले.
मुलीसाठी सतत कष्ट करत असल्याने तिने नाही लग्नही केले. तिच्या मित्रमंडळींनी त्यावेळेस तिला खूप समजवले पण त्यावेळेस तिचे वय कमी होते. या कालावधित तिने काही वाईट सिनेमेसुद्धा केले, ज्यामुळे लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. पण मुलीच्या संगोपनासाठी तिला पैशांची आवश्यकता होती.
नीना गुप्तांची मुलगी मसाबा गुप्ता आता जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर झाली आहे आणि मोठ्या ब्रँडच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानतंर स्वतःचा ब्रँडही तिनं निर्माण केला आहे.
‘चोली के पिछे क्या है’ हे गाणं नीना गुप्ताची त्यावेळेस असलेली गरज दाखवतं. खलनायक सिनेमात नीनाचा काही खास भूमिका नव्हती तरी तिने त्या गाण्याला खूप छान सादर केले. तिच्या वयाचे कलाकार असे धाडसी निर्णय घ्यायला घाबरायचे. अनेक कलाकार आपला समाजातील दर्जा पाहतात पण नीनाने याचा विचार न करता मनाचं ऐकलं आणि ती चोली के पिछे क्या है गाण्यावर थिरकली. गाण इतक हिट झालं की ते सिनेमाची ओळख बनलं.
काही काळानंतर नीना गुप्ताने सिनेसृष्टितून माघार घेत टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला. आणि 1998 मधल्या ‘सांस’ या कार्यक्रमाने तिला बॉलिवड इतकीच प्रसिद्धी दिली. या कार्यक्रमात नीनाने फक्त अभिनय नव्हे तर लिखाण आणि दिग्दर्शनसुद्धा केल होतं.
यानंतर 2017 मध्ये तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने मुंबईत राहत आहे आणि कामाच्या शोधात असल्याचं नमुद केलं होतं. बऱ्याच काळानंतर तिने हा बधाई हो सिनेमा केला. त्यामुळे चालेल की नाही अशी शंका प्रत्येकालाच वाटत होती. परंतु सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. भूमिका असो किंवा चित्रपटातील एखादं गाणं ते गाजलंच पाहिजे या उद्देशाने काम करणाऱ्या नीना गुप्ताचे सिनेमे हिट होतंच असतात.