बॉलिवूडची सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हीचा अंदाज काही औरच आहे. सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्रीच्या लग्नाला आज 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तरीही तिचा तिच्या सौंदर्यात मात्र काहीही बदल झालेला नाही.
एकीकडे करिनाचा बोल्ड अंदाज आणि निखळतं सौंदर्य तर दुसरीकडे सैफचा रुबाबदार अवतार त्यांच्या चाहत्यांना नेहमीच खूश करतो.
या दोघांच्या प्रेमाची निशाणी म्हणजे बॉलिवूडचा स्टार किड तैमूर अली खान. आज करिनाच्या लग्नाला 6 वर्ष झाली. ती एका मुलाची आई आहे पण तरीही तिच्या सौंदर्यामध्ये तीळमात्रही फरक झाला नाही.
बरं स्व:ताला इतकं फिट ठेवणं सोपं नाही आहे. त्यासाठी करिना डायट पासून ते रोज व्यायाम करते. त्यामुळे ती अजूनही तिच्या चाहत्यांना तितकीच आवडते.
2012मध्ये करिना आणि सैफचा विवाह झाला. टशन सिनेमाच्या शुटिंगवेळी सैफ आणि करिनामध्ये प्रेम झालं. खरंतर हा सिनेमा फ्लॉप झाला पण या दोघांची लव्ह स्टोरी मात्र हिट झाली.
जेव्हा सैफने करिनाच्या नावाचा टॅटू काढला तेव्हा त्यांच्या प्रेमाबद्दल मीडियामध्ये समजलं. या दोघांच्या लग्नाआधीही करिनाच्या फॅशनची चर्चा होती आणि आताही तिच्याच फॅशनचा जलवा आहे.
करिनाबद्दल आणखी बोलायच झालं तर तिची लव्ह लाईफ कधीच लपून राहिलं नाही. तिच्या दिलखुलास स्वभावामुळे ती सगळ्यांपर्यंत पोहचली. अगदी शाहीद कपूरपासून ते सैफ अली खानपर्यंतची सर्व रिलेशनशिप सगळ्यांना माहीत आहेत.
करिनाने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि तिचं अभिनय क्षेत्रातील प्रोफाईल नेहमी वेगळं ठेवलं. तिने तिच्या वैयक्तित आयुष्याचा परिणाम तिच्या कामावर कधीही पडू दिला नाही.
काही दिवसांआधी करिना विरे दे वेडिंग या तिच्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या रंगात आली होती.
एक मॉर्डन आयुष्य आणि आताची स्त्री कशी आहे यातला फरक तिने या सिनेमातून मांडला.
तिच्या या सिनेमातूनही तिच्या फॅशनच्या चर्चा खूप रंगल्या. प्रत्येक सिनमध्ये तिचा एक हटके लूक प्रेक्षकांनी पाहिला.
गेल्या काही दिवसांआधी करिना आणि सैफ त्यांच्या लाडक्या मुलासोबत म्हणजेच तैमूरसोबत फिरायला गेले होते. त्याचेही अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
करिना कपूरचं लव्ह लाईफ कधीच लपून राहिलं नाहीय. तिच्या दिलखुलास स्वभावामुळे ते सगळ्यांपर्यंत पोचलंय. अगदी शाहीद कपूरपासून सैफ अली खानपर्यंतची सर्व रिलेशनशिप सगळ्यांना माहीत आहेत.
तर गेल्या काही दिवसांमध्ये करिना आणि सैफ तैमूरला भावंड आणण्याच्याही विचार होते. तशा अनेक बातम्याही सोशल मीडियावर झळकत होत्या.