1968 मध्ये डेविड बर्ग नावाच्या एका व्यक्तीने चिल्ड्रन ऑफ गॉड नावाची संस्था सुरू केली. सुरूवातीला ही संस्था एका हिप्पी ग्रुप सारखीच होती. या समुहातील लोक आप आपसात गाणे वाजवायचे. पंरतु डेविड बर्गच्या डोक्यात काही वेगळंच चालत असे.
लोकांसमोर त्याने देवाच्या गोष्टी करायला सुरूवात केली आणि त्याचा फायदा घेत तो लहान मुलांचं शारीरिक शोषण करायचा. त्याच्या म्हणण्याप्रमाणे 12 वर्षांनंतर मुलं आणि मुलींमध्ये शारीरिक संबंध व्हायला हवे.
एवढेच नव्हे तर त्याने लहान मुलांना मोठ्यांसोबत संबंध करायला सांगितले आणि त्याचे काही फोटोही काढले. कृरतेची गोष्ट ही होती की, तो स्वत:च्या मुंलीसोबतही संबंध करत असे आणि आणि दुसऱ्यांना सुद्धा करायला प्रोत्साहन देत असे. जाणून घेऊया एका छोट्याशा संस्थेला सेक्सच्या नावाखाली कशाप्रकारे जगामध्ये प्रसिद्ध केलं?
60 च्या दशकात बर्ग अनेक चर्चमध्ये गेला होता. 1967 मध्ये तो कॅलिफोर्नियाच्या हंटिगंटन बीच इथं पोहचला. बर्गला वाटायचे जग सेक्ससाठी वेडं आहे. त्यने योजना तयार करून तरूण मुला मुलींना एकत्र करायला सुरूवात केली. सुरूवातीला तो 'टीन्स ऑफ क्राइस्ट' नावाची संस्था चालवत होता. ज्याचं नाव बदलून 'चिल्ड्रन ऑफ गॉड' ठेवण्यात आलं
आधी त्यानं आपल्या गोष्टींमध्ये भोळ्या तरूणांना फसवायला सुरूवात केली. 1969 पर्यंत त्यानं 50 लोकांना या पंथात समाविष्ट केलं. त्यानंतर त्याने संपूर्ण देशभरात चिल्ड्रन ऑफ गॉडच्या नावाचे बरेत निवासी ठिकाण बनवले.
जी लोकं या पंथाला मानायचे ते लोग या ठिकाणावर कुटुंबाप्रमाणे राहत असे. 1972 मध्ये संपूर्ण जगभरात चिल्ड्रन ऑफ गॉड पसरले गेले. याचा अजून प्रचार व्हावा यासाठी त्याने फ्लर्टी फिशिग योजना चालवली. ज्यात मुलींना तरूण मुलांसोबत संबंध बनवून त्यांना पंथात सहभागी करायचे होते.
ही योजना यशस्वी झाली. त्याने मुलींना सांगितले की स्वत:च्या शरीराचा तुम्ही देवाकरीता त्याग करत आहात. या योजनेनंतर अंदाजे 19,000 लोकं चिल्ड्रन ऑफ गॉड मध्ये सहभागी झाले.
सन 1981 पर्यंत ज्या मुलींनी संबंध बंनवले होते त्यांना मुलं देखील झाली होती. बर्गने आर्टच्या नावाखाली सेक्सला आपलं प्रचार माध्यम बनवलं. सेक्सला तो 'God's Love' बोलत असे.सन 1981 पर्यंत ज्या मुलींनी संबंध बंनवले होते त्यांना मुलं देखील झाली होती. बर्गने आर्टच्या नावाखाली सेक्सला आपलं प्रचार माध्यम बनवलं. सेक्सला तो 'God's Love' बोलत असे.